"साधी सरपंच पदाची निवडणूकही न लढवलेल्या राऊतांचा जावईशोध!"

    01-Apr-2024
Total Views |

Sanjay Raut 
 
मुंबई : ज्यांनी साधी सरपंच पदाची निवडणूकही लढवली नाही त्या संजय राऊतांनी एक जावई शोध लावला आहे, अशी टीका भाजप आमदार नितेश राणेंनी केली आहे. संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर केलेल्या टीकेला नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिले.
 
नितेश राणे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबई दौरा आहे. अपेक्षेप्रमाणे या दौऱ्यावर संजय राऊतांनी अकलेचे तारे तोडले. पंतप्रधानांचे हे दौरे आचारसंहितेचा भंग आहे असा जावई शोध त्यांनी लावला आहे. ज्यांनी साधी सरपंच पदाची निवडणूकही लढवली नाही, लोकांमध्ये कसं निवडून यायचं याचा ज्याला थांगपत्ताच नाही ते संजय राऊत निवडणूकीचे नियम आम्हाला सांगत आहेत," असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
 
 
ते पुढे म्हणाले की, "संजय राऊत इलेक्टोरल बॉण्डची चर्चा करतात. पण इलेक्टोरल बॉण्डच्या रुपाने उबाठाला आलेल्या पैशांचीही चर्चा व्हायला हवी. त्या देणगीदार कंपन्या नेमक्या कोण आहेत, हे कळायला हवं. उद्धव ठाकरेंच्या काळात महापालिकेत महापौर असताना ज्यांनी ज्यांनी इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून पैसे दिले आहेत, त्यांना मुंबई महापालिकेचे किती कंत्राट मिळालेले आहेत? कोरोना काळात त्या कंपन्यांना किती टेंडर भेटले याची चौकशी आणि चर्चा झाली पाहिजे. नुसतं रोज सकाळी उठून भाजपच्या नावाने मंत्र म्हटल्यापेक्षा उबाठाला इलेक्टोरल बॉण्डच्या रुपाने किती पैसे मिळाले आणि ते कुणी दिले याचा हिशोब आम्हालाही जाणून घ्यायचा आहे. उबाठाने हा हिशोब मांडण्याची हिंमत करावी," असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
 
"काल उद्धव ठाकरेंनी दिल्लीत बसून एक फार मोठा जोक केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, ते स्वत: देवेंद्र फडणवीसांना मणिपूरला पाठवण्यासाठी पैसे देणार आहेत. ज्यांना उभ्या आयुष्यात कधी स्वत:च्या खिशातून एक रुपयाही काढण्याची सवय नाही ते आता आमच्या देवेंद्र फडणवीसांना मणिपूरला पाठवण्याचा खर्च उचलणार आहेत. उद्धवजी, मणिपूर फाईल्स काढण्याआधी दिशा सालियान फाईल्स हा चित्रपट काढा आणि मुख्य भूमिकेत तुमच्या मुलालाच घ्या. कारण दिशा सालियान फाईल्स या चित्रपटाचा सुत्रधार तुमचा मुलगाच आहे," असेही ते म्हणाले.