सारांश आणि समारोप

    01-Apr-2024
Total Views |
Homeopathic Treatmentगेल्या सहा वर्षांपासून होमियोपॅथीचे सर्वांगीण बारकावे उलगडून दाखवणार्‍या लेखमालेचा आजचा हा अखेरचा भाग. पुढील मंगळवारी भेटूया योग विषयाला समर्पित एका नवीन लेखमालेसह...

होमियोपॅथीक औषधपद्धती ही गेल्या २०० वर्षांपेक्षाही अधिक काळ जगभरातील करोडो रुग्णांना रोगमुक्त करत आहे. होमियोपॅथीच्या उपयुक्ततेबाबत इतर औषधशास्त्रांकडून सतत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते व ही पॅथी उपयुक्त नाही, हे लोकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न इर्षेने केला जातो. परंतु, जी औषधपद्धती या सर्वांना तोंड देऊन गेली २०० वर्षे खंबीर उभी आहे व दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे, याचे कारण ही औषधप्रणाली संपूर्णपणे विज्ञानावर आधारित आहे व मुख्य म्हणजे, या औषधाने रुग्णाला बरे वाटते व आराम मिळतो.


हे करोडो रुग्णांच्या संख्येवरून लक्षात येते. होमियोपॅथी म्हणजे नुसता ’श्रिरलशले शषषशलीं’ हा गैरप्रचार करणार्‍या काही लोकांना होमियोपॅथीच्या रिजल्टने उत्तर मिळते. साधेच उदाहरण घ्यायचे झाले, तर जेव्हा १०3, १०५ अंश असलेला ताप होमियोपॅथीच्या औषधाने १२ ते २४ तासांत पूर्ण बरा होतो, तेव्हा तीन ते पाच दिवसांचा अँटीबायोटिक्सचा कोर्स करा, असे सांगणारे आपोआपच गप्प होतात. असो. सांगायचा मुद्दा असा की, होमियोपॅथीबद्दल अनेक गैरसमज लोकांमध्ये पसरवले गेले. पण, त्यात काहीही तथ्य नाही.

होमियोपॅथी ही एक परिपूर्ण औषधप्रणाली आहे. तीव्र रोग असे किंवा जुनाट आजार असो, होमियोपॅथीच्या उपचारांनी रुग्ण रोगमुक्त होऊ शकतो.|

होमियोपॅथी, आयुर्वेद व अ‍ॅलोपॅथी ही जर एकमेकांना पूरक अशी कार्य करत राहिली, तर रुग्ण फार लवकर रोगमुक्त होतील. पण, दुर्दैवाने असे होत नाही. असो.

हे सर्व परत एकदा सांगण्याचे कारण असे की, होमियोपॅथीची माहिती मी ‘ओळख होमियोपॅथीची’या सदरातून गेली सहा वर्षे सातत्याने देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. होमियोपॅथीबद्दल जर लिहीत राहायचे म्हटले, तर एक जन्मही कमी पडेल. गेल्या सहा वर्षांत मी अनेक विषयांना स्पर्श केला व माझ्या कुवतीप्रमाणे मी तो विषय सोपा करून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला यात कितपत सफल झालो हे वाचकांनाच ठाऊक. परंतु, वाचकांच्या हजारो फोन कॉल्सवरून मला त्यांनी ते आवडल्याच पोचपावती वेळोवेळी दिली.

गेली सहा वर्षे होमियोपॅथीबद्दल लिहूनही लक्षात आले की, अरे अजून तर बरेच काही आहे. परंतु, आता विचार केला की, कुठेतरी थांबायला हवे. दै. ‘मुंबई तरुण भारत’चे तर कसे आभार मानू हे मला कळत नाही आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या सहकार्याने सहा वर्षे ही लेखमाला चालू ठेवली, याबद्दल त्यांचे शतश: आभार. आता नवीन लेखकांना व लेखांना संधी मिळाली पाहिजे. म्हणून ही लेखमाली आवरती घेत आहे. आज जरी ही लेखमाला संपवत असलो, तरी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या बरोबर असलेले ऋणानुबंध तसेच घट्ट राहणार आहेत.

मी गेली २४ वर्षे मुंबईमध्ये होमियोपॅथीची Consulting प्रॅक्टिस करत असून, ‘महाराष्ट्र युनिर्व्हसिटी ऑफ हेल्थ सायन्स’ (M.V.H.V) द्वारे प्रमाणित होमियोपॅथीच्या स्पेशल कोर्सेसचा मी प्राध्यापक आहे. तसेच या कोर्सेसचा गाईडदेखील आहे. इंटरनॅशनल होमियोपॅथीक अकादमीला मी संलग्न आहे. या व्यतिरिक्त अनेक मोठ्या आजारांवर माझे संशोधन चालू आहे.

गेल्या अनेक वर्षांचा आता वाचकांशी ऋणानुबंध जुळला आहे. त्याच हक्काने मी सांगू इच्छितो की, होमियोपॅथीक औषध पद्धती सर्वांनी अंगीकारावी. सुखी व निरोगी आयुष्यासाठी होमियोपॅथी हा फार मोठा पर्याय आपल्याला उपलब्ध आहे. होमियोपॅथीच्याबद्दल पसरवल्या गेलेल्या गैरसमजुतींना बळी पडू नका, सर्व गैरसमजांना होमियोपॅथीने शास्त्रशुद्ध उत्तर दिले आहे. कुठल्याही शारीरिक वा मानसिक आजार असेल, तर होमियोपॅथीकडे त्याचे उत्तर आहे. संपूर्णपणे नैसर्गिक तत्त्वांवर व दुष्परिणामांपासून मुक्त अशी ही लाभदायक पॅथी आहे.

आपण सर्वांना आरोग्यदायी जीवन लाभो व आपले मन सदैव आंनदी राहो, यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो व मला हे लेख लिहिण्याची संधी दिल्याबद्दल दै. ‘ मुंबई तरुण भारत’चे, परमेश्वराचे आणि डॉ. हॅनेमान यांचे आभार मानून आपली रजा घेतो.

HOMOEOPATHY HEALS!!!
 
डॉ. मंदार पाटकर 
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.ः
(लेखमाला समाप्त)
९८६९०६२२७६