काँग्रेसला पुन्हा सुरुंग लागण्याची शक्यता; आमदारांनी दिले बंडाचे संकेत

    27-Mar-2024
Total Views |
congress
 
बंगळुरु : देशभरात लोकसभा निवडणुक २०२४ चे वारे वाहु लागले आहेत. सर्वंच पक्ष लोकसभेच्या जागेसाठी उमेदवार घोषित करत आहेत. अशामध्ये काँग्रेसला पुन्हा सुरुंग INC MLA resign लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे पाच आमदार काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. यात तीन विधानसभेतील आमदार आहेत, दोन विधान परिषदेतील आमदार आहेत.
 
कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री डॉ. एमसी सुधाकर यांनी आम्ही घराण्यांते गुलाम नाही असं अनेक आमदारांचं म्हणणं आहे आणि त्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेस लोकसभा निवडणुकीत कुटुंबातच तिकीटवाटप करत आहे. आम्ही कुटुंबाचे गुलाम नाही असं अनेक आमदारांचं म्हणण असल्याचं डॉ. एमसी सुधाकर यांनी म्हटल्याचं माध्यमांमध्ये वृत्त आहे.
 
कोलार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री केएच मुनीयप्पा यांच्या नातेवाईकाला तिकीट दिले. त्यावरुन पक्षात नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे. आम्ही मुनीयप्पा कुटुंबाचे गुलाम नाही असं अनेक आमदारांच म्हणणं आहे.
 
पाच आमदारांनी पार्टी हायकमांडकडे कुटुंबातच तिकीट देण्यावरुन नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर या आमदारांनी पक्षाचा राजीनामा देण्याची धमकीही हायकमांडला दिली आणि आपली नाराजी व्यक्त केली. यावर पार्टी हायकमांडने आमचं म्हणणं एकुन घेतलं पण त्यावर कोणतीही कारवाई केली नाही अथवा आमच्या त्याची दखल घेतली नाही असंही या आमदारांनी म्हटलं आहे.