मविआत प्रकाश आंबेडकर 'वंचित' राहणार! नवी खेळी

    17-Mar-2024
Total Views |

Prakash Ambedkar


मुंबई :
महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जागावटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर मविआमध्ये वंचित राहणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. शनिवारी महाविकास आघाडीची महत्वाची बैठक पार पडली असून जागावाटप निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलानुसार उबाठा गटाला २२ जागा, काँग्रेसला १६ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला १० जागा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतू, वंचित बहुजन आघाडीच्या जागांबाबत अजून कुठलीही स्पष्टता नाही. उलट वंचितला सोबत न घेता लोकसभा निवडणूक लढवण्याची चाचपणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
हे वाचलंत का? -  राहूल गांधींच्या सभेला इंडी आघाडीचे नेते दाखल!
 
मागच्या वेळी महाविकास आघाडीने वंचितला ४ जागांचा प्रस्ताव दिला होता. पण वंचितने महाविकास आघाडीकडे १७ जागांची मागणी केली आहे. दरम्यान, मविआ ४ जागांवर ठाम आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये असल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्याप त्यांचे जागांवर एकमत होताना दिसत नाही.
 


 
अग्रलेख
जरुर वाचा