राहूल गांधींच्या सभेला इंडी आघाडीचे नेते दाखल!

    17-Mar-2024
Total Views |

Rahul Gandhi


मुंबई :
लवकरच शिवाजी पार्कवर काँग्रेस नेते राहूल गांधींच्या भव्य सभेला सुरुवात होणार असून या सभेला इंडी आघाडीतील अनेक नेते उपस्थित राहणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे नेतेही या सभेकरिता शिवाजी पार्कवर दाखल झाले आहेत. लवकरच सभेला सुरुवात होणार असून राहूल गांधी शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
दरम्यान, शिवाजी पार्कसमोर असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला राहूल गांधी अभिवादन करतील का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यास महाराष्ट्रात फिरु देणार नाही, अशी तंबीही राहूल गांधींना देण्यात आली आहे. सावरकरांच्या पुतळ्यासमोर मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
हे वाचलंत का? - मविआचा सांगली लोकसभेचा तिढा सुटला! 'या' पक्षाचा उमेदवार निश्चित
 
शिवाजी पार्कवर राहूल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होणार आहे. त्यानंतर राहूल गांधींची जाहीर सभा पार पडणार असून या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरदेखील उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे.