मुंबई (विशेष प्रतिनिधी): जागतिक पाणथळभूमी दिनानिमित्त शुक्रवार दि. २ फेब्रुवारी रोजी पर्यावरण दक्षता मंडळामार्फत परिषद आयोजित करण्यात आली होती. मुंबई विद्यापिठाच्या ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियममध्ये ही परिषद पार पडली असून यामध्ये महाएमटीबी आणि द हॅबिटॅट्स ट्रस्ट निर्मित धामापुर तलाव ही शॉर्ट फिल्म प्रदर्शित केली गेली.
पाणथळभूमींचे संवर्धन आणि संरक्षण करणे कसे गरजेचे आहे याबरोबरच पाणथळभूमीमधील अधिवास, या परिसंस्थेमध्ये आढळणारी जैवविविधता या विषयांवर तज्ञांनी प्रकाश टाकला.
डॉ. अजय देशपांडे आणि डॉ. रितेश कुमार यांनी मार्गदर्शन सत्र घेतली. तसेच यावेळी पोस्टर मेकिंग, शॉर्ट फिल्म, निबंध लेखन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई विद्यापीठाबरोबरच पर्यावरण दक्षता मंडळ, एनविरो व्हिजिल आणि एटीबीएस असोसिएशन ऑफ टीचर्स बायोलॉजीकल सायन्सेस यांनी एकत्रितपणे या परिषदेचे आयोजन केले होते.