मुंबई : उत्तर प्रदेश येथे होत असलेल्या कावड यात्रेदरम्यान योगी सरकारने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तयारी सुरु केली आहे. राज्यात तसेच यात्रा मार्गावर कायदा व सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी संपूर्ण मार्गावर २९ हजार ४५४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून ५० हजार हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत.
अशी माहिती आहे की, या व्यवस्थेअंतर्गत उत्तर प्रदेशात अँटी-ड्रोन आणि टेथर्ड ड्रोनसह एकूण ३९५ उच्च तंत्रज्ञानाचे ड्रोन पोलिस मुख्यालयाला थेट फीड देत आहेत. याशिवाय एक अत्याधुनिक मॉनिटरिंग आणि कंट्रोल रूम देखील उभारण्यात आली आहे, जिथून यात्रा मार्ग आणि परिसरातील शिवमंदिरांवर २४ तास नजर ठेवली जात आहे. पोलिसांनी देखील स्पष्ट केले आहे की, अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध किंवा सोशल मीडियावर भ्रामक वा संवेदनशील पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध तात्काळ कारवाई केली जाईल.
सुरक्षा व्यवस्थेमध्ये १४२४ होमगार्ड, पोलीस आणि निमलष्करी दलांमधून २०४० निरीक्षक, १३ हजार ५२० उपनिरीक्षक, ५८७ राजपत्रित अधिकारी आणि ३९ हजार ९६५ पोलीस शिपाई तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच शेजारील राज्यांशी समन्वय राखण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे, ज्यामध्ये उत्तर प्रदेशसह उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानमधील अधिकारी सहभागी आहेत.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक