खलिस्तानी दहशतवादी पन्नूला आखाडा परिषदेचा इशारा

    27-Dec-2024
Total Views |

Akhada Parishad on Pannu

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Akhada Parishad Comment on Pannu)
खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभादरम्यान खलिस्तानी दहशतवादी हल्ला करणार असल्याची धमकी नुकीतच एका व्हिडिओद्वारे दिली होती. मात्र पन्नूच्या धमकीला न जूमानता आखाडा परिषदने प्रत्युत्तर म्हणून कडक इशारा दिला आहे. "पन्नूने महाकुंभात शिरण्याचे धाडस केल्यास त्याला बदडवून बदडवून पळवून लावले जाईल.", अशा स्पष्ट शब्दांत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी यांनी सुनावले आहे.

हे वाचलंत का? : नाताळच्या दिवशी रचला ख्रिश्चनांची १७ घरे जाळण्याचा कट!

महंत रवींद्र पुरी पुढे म्हणाले, पन्नू सारख्या वेड्यांना आम्ही फारसे गांभीर्याने घेत नाही. असे शेकडो वेडे आपण पाहिले आहेत. हा तो माघ मेळा आहे, जिथे शीख आणि हिंदू सर्व एक आहेत. पन्नूने आमच्यात फूट पाडण्याबाबत केलेले विधान योग्य नाही. नागा साधूंप्रमाणे शीख समाजातही साधू आहेत. ते दोघेही सनातनचे सैनिक आहेत. त्यामुळे आम्ही पन्नू सारख्या पागलांना गांभीर्याने घेत नाही."

नुकताच पन्नूने एक व्हिडिओ जारी केला होता. ज्याद्वारे त्याने धमकी दिली होती की, महाकुंभादरम्यान तो खलिस्तानी दहशतवाद्यांच्या मृत्यूचा बदला घेईल ज्यांची पिलीभीतमध्ये नुकतीच चकमक झाली होती.