बँक ऑफ इंडियाच्या मांडवी शाखेत ‘इंटेग्रिटी शपथ’ विधी संपन्न

    27-Oct-2024
Total Views |
bank of india mandavi branch  


मुंबई :      बँक ऑफ इंडियाच्या मांडवी शाखेत ‘इंटेग्रिटी शपथ’ विधी संपन्न पार पडणार आहे. बँक ऑफ इंडियाने दि. १६ ऑगस्ट ते दि. १५ नोव्हेंबर या कालावधीत साजरा केला जात आहे. केंद्रीय सतर्कता आयोग(सीव्हीसी) आणि मुख्यालयाच्या सतर्कता विभागाच्या मार्गदर्शनाखाली बँक ऑफ इंडियाकडून जागरुकता सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.




दरम्यान, सतर्कता जागरूकता सप्ताह २०२४ अंतर्गत बँक ऑफ इंडियाच्या मांडवी शाखेत कर्मचारी आणि ग्राहकांसाठी 'इंटेग्रिटी शपथ' विधी आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाचा कालावधी १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत असणार आहे. ‘इंटेग्रिटी शपथ’ विधीला मुंबई दक्षिण विभागाच्या सतर्कता विभागाचे मुख्य व्यवस्थापक अमित कुमार गुप्ता, शाखा प्रमुख राकेश गुप्ता आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.