नवी दिल्ली : कला आणि साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी संस्कार भारती, दिल्ली प्रांतातर्फे 'कला संकुल' मध्ये मासिक नाट्य परिसंवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे’ संचालक चित्तरंजन त्रिपाठी आणि प्रसिद्ध नाट्य समीक्षक अनिल गोयल या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘नव पिढीतील लेखकांची भारतीय दृष्टी आणि त्यांच्यासमोरील आव्हाने’ या विषयावर या कार्यक्रमात परिसंवाद झाला. परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी संस्कार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री अभिजित गोखले, चित्तरंजन त्रिपाठी, अनिल गोयल, कुलदीप शर्मा उपस्थित होते.