बायोपिक करण्यासाठी अद्वितीय चरित्र असण्याचीच गरज नाही : परेश मोकाशी

    26-Sep-2023
Total Views | 26

paresh mokashi
 
रसिका शिंदे-पॅाल
 
मुंबई  : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आणि लेखन परेश मोकाशी लिखित ‘आत्मपॅम्फलेट’ हा जगाचा इतिहास बदलणारा बायोपिक ६ ॲाक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा याच चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष बेंडे यांच्या जीवनातील काही घटनांवर आधारित आहे. यात एक प्रेमकथा सांगितली असून ती कशी  वाढत्या वयानुरुप बदलत जाते हे दाखवले आहे. महत्वाचे म्हणजे या संपुर्ण चित्रटाचे कथन त्यांच्या आवाजात असून मराठीत असा पहिलाच प्रयोग त्यांनी केला आहे. ‘वाळवी’ हा पहिला मराठीतील रहास्यपट प्रेक्षकांना दिल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीत हा प्रयोग करण्याचे ठरवले असून चित्रपटाची कथा परेश मोकाशी सांगत आहेत. 
 
मराठीतील या पहिल्या प्रयोगाबद्दल ‘महाएमटीबीशी’ बोलताना परेश मोकाशी म्हणाले, “या चित्रपटाचा दिग्दर्शक आशिष बेंडे माझा खास मित्र आहे. आणि त्याच्यासाठी चांगली संहिता लिहावी असं कायम मनात होतं. आणि मग त्याच्याच आयुष्यातील त्याने वारंवार सांगितलेले प्रसंग आम्हाला चित्रपटाची कथा म्हणून रंजक वाटले. त्यानंतर चित्रपटाची उत्कृष्ट कथा लिहिली गेली. मात्र, वैशिष्ट्यपूर्ण असा हा चित्रपट असावा म्हणून गंमतशीर निवेदन शैली वापरण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि हा अनोखी प्रयत्न पहिल्यांदाच केला आहे,” असे परेश मोकाशी म्हणाले.
 
पुढे ते असं देखील म्हणाले की, “आजवर अनेक थोरामोठ्यांच्या जीवनावर किंवा त्यांच्या कारकिर्दीवर आधारित बायोपिक आपण पाहिले. पण प्रत्येकवेळी बायोपिक करण्यासाठी अद्वितीय चरित्र असण्याचीच गरज नाही. सामान्य माणसाचे देखील बायोपिक असूच शकतात. जर त्याचे रुपांतर तुम्ही चांगल्या चरित्रपटात करु शकलात तर ते देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवणारं आत्मचरित्र असू शकतो”, असं देखील परेश मोकाशी म्हणाले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
भांडूप परिमंडलात विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती कार्यक्रम

भांडूप परिमंडलात विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती कार्यक्रम

महावितरणच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘शुन्य अपघात महावितरण, शुन्य अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन दि. १ ते ६ जून २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यात विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २ जून २०२५ रोजी रहिवासी परिसरात विद्युत सुरक्षा विषयी जनजागृती कार्यक्रम राबविण्याचे योजिले होते. त्याप्रमाणे, भांडूप परिमंडलातील ठाणे, वाशी व पेण मंडळातील प्रत्येक विभागीय कार्यालयांतर्गत विविध ठिकाणी विद्युत सुरक्षा बाबत जनजागृती कार्यक्रम करण्यात आले व सदर कार्यक्रमाला ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121