गणेशोत्सवाच्या सजावटीला स्पर्धेचा साज

ठाण्यात विविध राजकिय पक्ष तसेच प्रशासनाकडुन सार्वजनिक तसेच घरगुती गणेशोत्सव आरास स्पर्धांचे आयोजन

    18-Sep-2023
Total Views |

ganpati


ठाणे :
ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी तसेच घरगुती बाप्पांच्या सजावटीला यंदाही साज चढला असुन विविध राजकिय पक्ष तसेच प्रशासनाकडुन आरास स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे महापालिका, पोलीस प्रशासन तसेच जिल्हा निवडणुक विभागाच्यावतीने आणि भाजप , दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजितदादा गट) यांच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्या मंडळांना रोख पारितोषिकासह पदकेही प्रदान केली जाणार आहेत.

 
ठाणे शहर हे प्राचीन काळापासुन संस्कृती आणि उत्सवाचे माहेर घर असुन वर्षभर मोठ्या प्रमाणात धार्मिक उत्सव, पारंपारिक उपक्रम ठाणे शहरात साजरे होत असतात. यंदाही गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत असुन सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्याना आणि होतकरू कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच घरांघरांमध्ये नाविन्यपूर्ण कल्पनांचा अविष्कार करणाऱ्या हरहुन्नरी कलावंतांची उमेद वाढावी. त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांच्या उत्साहाला विधायक वळण मिळावे व त्यातून समाजप्रबोधनाचे, हिंदुत्वाचे व राष्ट्रीयत्वाच्या भावना वाढीस लागाव्यात या हेतूनेच स्पर्धांचे आयेाजन केले जात आहे. अशा स्पर्धामुळे गणेशोत्सवात एकप्रकारे चुरस निर्माण होऊन कलावंताच्या गुणांची कदर करण्याची संधी प्राप्त होत असते.


राजकिय पक्षांसोबतच स्थानिक प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीनेही मतदान जागृती आणि शासकिय उपक्रमांच्या जनजागृतीसाठी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.सजावटीत पर्यावरणपूरक गोष्टींचा अंतर्भाव, देखाव्याच्या कलात्मकतेसोबत देखाव्याचा उद्देश आणि निर्माल्य तसेच स्वच्छता याविषयी करण्यात आलेल्या गोष्टींचा सजावटींना विशेष बाब म्हणून विचार केला जाणार आहे. यंदा या स्पर्धामध्ये राजकिय पक्षांनी हजारांसह लाखांपर्यतची पारितोषिके आणि स्मृतीचिन्हे व प्रशस्तीपत्रके देण्याचे जाहिर केले आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसेच विविध सेलच्यावतीनेही गणेशोत्सव आरास तसेच घरगुती सजावटीसाठी स्पर्धा आयोजित केल्या आहेत.


उत्सवप्रेमी ठाणे मनपा
ठाणे महापालिकेमार्फत आयोजित गणेशोत्सव आरास स्पर्धेत विजेत्या मंडळाना पहिले पारितोषिक १०,००० रु., दुसरे पारितोषिक रु.७,५००/- व तिसरे पारितोषिक रु ६,५००/- अशी एकूण आठ बक्षिसे, स्मृतीचिन्हे आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहेत. आरास स्पर्धेबरोबर 'उत्कृष्ट मुर्ती' आणि 'स्वच्छता' या साठी पारितोषिके देण्यात येतील. ठाणे महापालिका क्षेत्रातील अनंत चतुर्दशीपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारी मंडळे या आरास स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. संस्था/ मंडळ हे मा. धर्मादाय आयुक्त यांचेकडे नोंदणीकृत असले पाहिजे.असे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.


शिवसेनेच्यावतीने श्री गणेश दर्शन स्पर्धा
धर्मवीर आनंद दिघे यांची परंपरा कायम राखत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाही शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्यावतीने श्री गणेश दर्शन स्पर्धा आयोजित केली आहे. या अभिनव स्पर्धेचे यंदा ३१ वे वर्षे असून त्यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा आजतागायत अखंडीत सुरु ठेवली आहे. या स्पर्धेत ठाणे शहरासाठी प्रथम पारितोषिक रु. 1,00,000, द्वितीय पारितोषिक रु. 75,000 स्मृतीचिन्ह, तृतीय पारितोषिक रु. 50,000, चतुर्थ पारितोषिक रु. 25,000 ,पाचवे पारितोषिक रु. 21,000, क्र. 6 ते 10 पर्यत पारितोषिके रु. 15,000 ची पारितोषिके व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. तर तीन विशेष पारितोषिके असून त्यांना रु. 10,000 व स्मृतीचिन्ह, उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास रु. 10,000 व स्मृतीचिन्ह, उत्कृष्ट मूर्तीकार (2) रु. 10,000 व स्मृतीचिन्ह तर उत्तेजनार्थ पारितोषिके 15 असून रु. 10,000 व स्मृतीचिन्ह ठेवण्यात आले आहे. तर आदर्श विसर्जन मिरवूणक काढणाऱ्या मंडळास रु. 21000 व स्मृतीचिन्ह व उत्कृष्ट सजावटकारास रु. 10,000 व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात येईल.
दरम्यान कल्याण शहर (सजावटीसाठी) प्रथम पारितोषिक रु. 25,000, द्वितीय पारितोषिक रु. 21,000, तृतीय पारितोषिक रु. 15,000, उत्तेजनार्थ पारितोषिक रु. 10,000 व स्मृतीचिन्ह ठेवण्यात आले आहे. (उत्कृष्ट मुर्तीसाठी) प्रथम पारितोषिक रु. 11,000, द्वितीय पारितोषिक रु. 7500 , तृतीय पारितोषिक रु. 5000 व स्मृतीचिन्ह, उत्तेजनार्थ पारितोषिक रु. 5000 व स्मृतीचिन्ह ठेवण्यात आले आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज आनंदाश्रम, टेंभीनाका व शिवसेना शाखा किसननगर नं. २ ठाणे येथे उपलब्ध आहेत.


पर्यावरण जागृती आणि सजावट कलेला प्रोत्साहन
व्यास क्रिएशन्स् आणि राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशन
यांच्यावतीने राज्यात घराघरात साजरा होणार्‍या गणेशोत्सवासाठी घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आणि सेल्फी विथ गणपती बाप्पाचे आयोजन केले आहे.प्रथम ः रोख रु. 11,111/- + सन्मानचिन्ह ; द्वितीय रोख रु. 7,777/- + सन्मानचिन्ह; तृतीय रोख रु. 5,555/- + सन्मानचिन्ह आणि उत्तेजनार्थ अनेक बक्षिसे देण्यात येणार आहेत.सेल्फी विथ गणपती बाप्पा साठीही रोख बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विनामुल्य असलेल्या या स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी 9967637255 या क्रमांकावर संपर्क साधावा.


राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आरास स्पर्धा
ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली बाप्पाच्या आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत प्रथम पारितोषिक ५१ हजार, द्वितीय पारितोषिक ओवळा-माजिवडा, ठाणे शहर, कोपरी- पाचपाखाडी, कळवा-मुंबा या चार विधानसभानिहाय २१ हजार रुपये, तृतीय पारितोषिक ओवळा-माजिवडा, ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, कळवा-मुंबा या चार विधानसभानिहाय ११ हजार रुपये, दिले जाणार आहे.ठाणे महापालिका क्षेत्रापुरती मर्यादित असलेल्या या स्पर्धेत [email protected] या ईमेल आयडीवर मंडळाच्या सजावटीचे ४ ते ८ मिनिटांचे फोटोज तसेच १२० सेकंदाचा व्हिडिओ पाठवण्याचे आवाहन केले आहे. अशी माहिती नित्यानंद वाघमारे यांनी दिली आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.