लंडनचा ऐतिहासिक 'इंडिया क्लब' बंद

    18-Sep-2023
Total Views |
Historic India Club


नवी दिल्ली
: लंडनमधील ७० वर्षे जुने ऐतिहासिक 'इंडिया क्लब' दि. १७ सप्टेंबरपासून कायमचे बंद झाले. या इंडिया क्लबने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लंडननजीकच्या या क्लबमध्ये १९३० आणि १९४० च्या दशकात देशाला ब्रिटिशांपासून मुक्त करण्यासाठी राष्ट्रवादी नेते जमत असतं.
 
विशेष म्हणजे, या क्लबचे संस्थापक सदस्य कृष्ण मेनन होते, जे ब्रिटनमध्ये स्वतंत्र भारताचे पहिले उच्चायुक्त बनले होते. 'इंडिया क्लब', यूके मधील सुरुवातीच्या भारतीय रेस्टॉरंटपैकी एक, भारतीय स्वातंत्र्यानंतर ब्रिटीश दक्षिण आशियाई समुदायात रूपांतरित झाले. क्लब मॅनेजर फिरोजा मार्कर यांनी सांगितले की, "जेव्हापासून लोकांना कळले की आम्ही १७ सप्टेंबर रोजी बंद इंडिया क्लब बंद करत आहोत, तेव्हापासून त्यांना धक्का बसला आहे."

तत्पूर्वी, फिरोजा मार्कर म्हणाल्या, "अत्यंत जड अंतःकरणाने, आम्ही इंडिया क्लब बंद करण्याची घोषणा करतो, ज्याचा शेवटचा दिवस १७ सप्टेंबर आहे, त्या दिवशी ते लोकांसाठी शेवटचे खुले राहील." ते पुढे म्हणाले की आम्ही येथून निघून जाऊ. पण या ठिकाणावरचे इंडिया क्लब बंद केले तरी, त्यांचे स्थलांतरण करण्यासाठी आम्ही आजूबाजूच्या परिसरात नवीन जागा शोधत आहे. पारशी वंशाचे यादगर मार्कर हे त्यांची पत्नी फ्रॅनी आणि मुलगी फिरोजा यांच्यासोबत इंडिया क्लब चालवत आहेत.

इंडिया क्लब बंद करण्याच्या विरोधात दीर्घ लढाई झाली, ज्यात समर्थकांना पराभवाचा सामना करावा लागला. मार्कर कुटुंबाने लंडनमध्ये 'सेव्ह इंडिया क्लब' मोहीम दीर्घकाळ चालवली, तरीही त्यांना विजय मिळाला नाही. क्लब मॅनेजर फिरोजा मार्कर यांनी सांगितले की, भारतीयांसाठी हे ठिकाण घरापासून दूर असलेल्या घरासारखे आहे. इथे येणार्‍या प्रत्येक भारतीयाला नेहमीच आपुलकीची भावना असते.

ब्रिटिश भारतीय इतिहासकार आणि पत्रकार श्राबानी बसू म्हणाल्या, "हे अगदी हृदयद्रावक आहे. भारतीय इतिहासाचा एक तुकडा लंडनमध्ये कायमचा हरवला जाईल. लंडनमध्ये राहणारी एक भारतीय पत्रकार म्हणून, आमच्यासाठी हे प्रेरणास्थान आहे.
 
वास्तविक, भारताच्या पूर्ण स्वातंत्र्यासाठी ब्रिटनमध्ये इंडिया लीग नावाची संघटना स्थापन करण्यात आली होती. लीगची स्थापना कृष्ण मेनन यांनी १९२८ मध्ये केली होती. अशा परिस्थितीत इंडिया लीग ब्रिटनच्या सर्व बैठका लंडनच्या इंडिया क्लबमध्ये पार पडल्या. यामुळेच भारतीयांच्या अनेक सोनेरी आठवणी या क्लबशी जोडलेल्या आहेत.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.