चर्चेपासून पळ आणि आरोपांमध्येच बळ? ; निवडणूक आयोगाचे चर्चा करण्यासाठी राहुल गांधी यांना आमंत्रण

    24-Jun-2025
Total Views | 31
 
Rahul Gandhi invited to discuss the Election Commission
 
नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरील त्यांच्या आरोपांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना संवाद साधण्यासाठी आमंत्रित केले आहे, अशी माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पत्र १२ जून रोजी ईमेलद्वारे पाठवण्यात आले होते. त्याचप्रमाणे त्यांच्या निवासस्थानीही ते प्राप्त झाले.
 
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत "मतांची हेराफेरी" झाल्याचे निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत. तथापि, आयोगाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानंतर राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाने निवडणुकीचे व्हिडिओ फुटेज आणि छायाचित्रे जतन करण्याच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांच्या पार्श्वभूमीवर पुरावे नष्ट करणे हे निवडणूक हेराफेरीचे संभाव्य सूचक असल्याचे नमूद केले आहे. राहुल गांधी यांचे हेदेखील आरोप आयोगाने वेळोवेळी फेटाळून लावले आहेत.
 
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांच्या वेबकास्टिंगचे व्हिडिओ किंवा सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्याची मागणी होत असताना, निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की हे मतदारांच्या गोपनीयतेच्या आणि सुरक्षिततेच्या चिंतेच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. असे फुटेज शेअर केल्याने मतदान करणारा मतदार आणि मतदान न करणारा मतदार दोघांनाही समाजविरोधी घटकांकडून दबाव, भेदभाव आणि धमकी येण्याचा धोका निर्माण होईल.
 
‘त्या’ मागणीमागचे नेमके कारण काय ?
 
जर एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाला एखाद्या विशिष्ट बूथवर कमी मते मिळाली, तर सीसीटीव्ही फुटेजद्वारे कोणत्या मतदाराने मतदान केले आहे आणि कोणत्या मतदाराने नाही हे ओळखणे सोपे होईल. त्यानंतर ते मतदारांना त्रास देऊ शकतात किंवा धमकावू शकतात. त्यामुळे अशा व्यक्ती किंवा हितसंबंध गटांच्या या मागणीमागे नेमके काय आहे हे उलगडणे आणि उघड करणे आवश्यक आहे, असेही सूत्रांनी म्हटले आहे.
 
 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121