दहशतवादविरोधी क्षमतावाढीसाठी २ हजार कोटींचे करार - संरक्षण मंत्रालयाची आपत्कालीन खरेदीस मंजुरी

    24-Jun-2025
Total Views | 15
 
Defence Ministry approves emergency procurement of Rs 2,000 crore contract to enhance counter terrorism capabilities
 
नवी दिल्ली: विशेष प्रतिनिधी दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये भारतीय लष्कराच्या सज्जतेला बळ देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने आपत्कालीन खरेदी यंत्रणेअंतर्गत तेरा करारांना अंतिम रूप दिले आहे. भारतीय लष्करासाठी २ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी १ हजार ९८१ कोटींचे करार निश्चित केले आहेत.
 
आपत्कालीन खरेदीअंतर्गत जलदगती प्रक्रियेच्या माध्यमातून केल्या गेलेल्या या खरेदीचे उद्दिष्ट दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी तैनात सैनिकांना संरक्षण पुरवणे, परिस्थिती आकलन, आक्रमकता आणि गतिशीलता यात वाढ करण्याचे आहे. क्षमता वाढ जलद गतीने व्हावी, हे सुनिश्चित करण्यासाठी अधिग्रहण कमी कालावधीत पूर्ण करण्यात आले.
 
सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतीय सैन्याला आधुनिक, मोहिमेसाठी तयार आणि पूर्णपणे स्वदेशी प्रणालींनी सुसज्ज करण्याच्या मंत्रालयाच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब या खरेदीतून दिसून येते. तातडीची क्षमता तफावत भरून काढण्यासाठी आणि महत्त्वाच्या उपकरणांचा वेळेवर समावेश सुनिश्चित करण्यासाठी आपत्कालीन खरेदी यंत्रणा मार्ग हा एक प्रमुख मार्ग आहे.
 
या उपकरणांची होणार खरेदी
 
· एकात्मिक ड्रोन शोधन आणि भेदन प्रणाली (आयडीडीआयएस)
· कमी उंचीवर कमी वजनाचे रडार (एलएलएलआर)
· अत्यंत कमी पल्ल्यावरच्या हवाई संरक्षण प्रणाली - प्रक्षेपक आणि क्षेपणास्त्रे
· रिमोटली पायलटेड हवाई वाहने (आरपीएव्ही)
· व्हर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग (व्हीटीओएल) सिस्टीमसह लोइटरिंग म्युनिशन्स
· ड्रोनच्या विविध श्रेणी
· बुलेट प्रूफ जॅकेट
· बॅलिस्टिक हेल्मेट्स
· क्विक रिअॅक्शन फायटिंग व्हेइकल्स (क्यूआरएफव्ही) - जड आणि मध्यम
· रायफल्ससाठी नाईट साईट्स
 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121