नमो एक्सप्रेस गणेशभक्तांना घेऊन कोकणात दाखल!

- उपमुख्यमंत्री फडणवीसांनी "नमो एक्सप्रेस" ला दाखवला हिरवा झेंडा!

    16-Sep-2023
Total Views |

Devendra Fadnavis 
 
 
मुंबई: गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात आणि टाळ मृदुंग वाजवत गणेशभक्त गणेशोत्सावासाठी कोकणात दाखल झाले. दादर रेल्वे स्थानकातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. मुंबई भाजपाच्या वतीने खास नमो आणि मोदी एक्स्प्रेसची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन नमो एक्सप्रेसमधून एकूण ३६०० प्रवासी कोकणात रवाना झाले. कोकणवासीयांसाठी एकूण सहा ट्रेन सोडण्यात येत आहेत. कोकणवासीयांना हा प्रवास पूर्णपणे मोफत असणार असून, प्रवासादरम्यान एक वेळचे जेवणही दिले गेले.
 
यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार, कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा, आ. मिहिर कोटेचा, महामंत्री संजय उपाध्याय, मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे उपस्थित होते. मुंबईमधून मोठ्या संख्येने चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात जातात. या पार्श्वभूमीवर नमो आणि मोदी एक्सप्रेसची सोय करण्यात आली आहे. गतवर्षी कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी भाजपाच्या वतीने मोदी एक्स्प्रेस चालवण्यात आली होती. त्याला कोकणवासीयांचा अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला.
 
या एक्स्प्रेसचा गतवर्षी शेकडो प्रवाशांनी लाभ घेतला. गणेशभक्तांनी या सेवेबद्दल आनंद व्यक्त करताना भारतीय जनता पक्षाचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. कोकणवासीयांसाठी गणेशोत्सव हा आनंदाचा सण आहे. अधिकाधिक सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी ६ ट्रेन आणि २३८ बसेसची सोय केली आहे. कोकणवासीयांनी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा अश्या शुभेच्छा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.