ठाणे : ठाणे जिल्हा क्रिडा विभाग व कर्मवीर भाऊराव पाटील (केबीपी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा ग्रामीण निवड चाचणी स्पर्धा दि.१२ व १३ सप्टेंबर रोजी संपन्न झाली.या स्पर्धेत न्यु कळवा हायस्कूल व ज्यु.कॉलेज विजेता ठरला.
वागळे इस्टेट येथील आदर्श विकास मंडळाच्या केबीपी महाविद्यालयात पार पडलेल्या या कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला आदर्श विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन बी. मोरे, ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सुरेश ठाणेकर, राज्य कुस्ती संघटनेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, उपाध्यक्ष रमाकांत पाटील, सदस्य रंगराव पाटील, चिटणीस तुकाराम खुटवळ, केबीपी महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष गावडे, क्रिडासंचालक एकनाथ पवळे आदी उपस्थित होते.
दोन दिवस चाललेल्या या अटीतटीच्या स्पर्धेत न्यू कळवा हायस्कूल व ज्यू. कॉलेजने प्रथम क्रमांक, मानपाडा येथील सेंट झेवियर्स हायस्कूलने व्दितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक कळवा येथील सहकार विद्यालयाने पटकाविला. पडवळ नगर येथील पडवळ विद्यालयाला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.गुणांच्या आधारे विजेत्या शाळांना कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातर्फे ट्राफी देण्यात आल्या. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा क्रिडा अधिकारी व छञपती पुरस्कार विजेत्या सुवर्णा बारटक्के, क्रिडा अधिकारी सुचिता ढमाले, क्रिडा समन्वयक शंकर बरकडे आदि मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची मुंबई विभागासाठी निवड होणार आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन क्रिडा शिक्षक निलेश शिंदे यांनी केले.