काश्मीरमध्ये कर्नलसह ३ जवान हुतात्मा; दोन दहशतवादी ठार!

    13-Sep-2023
Total Views |
Jammu Kashmir encounter

नवी दिल्ली
: जम्मू-काश्मीरमधील राजौरी आणि अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये एनकाउंटर सुरू आहे. दि. १३ सप्टेंबर रोजी दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल शोध मोहीम राबवत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये कर्नल मनप्रीत सिंग हुतात्मा झाले. तर एक पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे.
 
दुसरीकडे, राजौरीमध्ये दि. ११ सप्टेंबरुपासून चकमक सुरू आहे. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले आहेत. यात एक जवान आणि एक एसपीओ हुतात्मा झाले. या कारवाईत लष्कराच्या एका कुत्र्याचाही मृत्यू झाला आहे. त्याने स्वत:चा जीव धोक्यात घालून आपल्या हँडलरचा जीव वाचवला.
एनकाउंटर दरम्यान लष्कराच्या कुत्र्याने हँडलरला वाचवले. या एनकाउंटरमध्ये शहीद झालेल्या लष्कराच्या कुत्र्याचे नाव 'केंट' असल्याचे लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.एनकाउंटरदरम्यान त्याने आपल्या हँडलरला वाचवले आणि तो हुतात्मा झाला. पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ते सैनिकांच्या तुकडीचे नेतृत्व करत असताना हा अपघात झाला. यावेळी त्यांच्यावर जोरदार गोळीबार झाला.


दरम्यान एडीजी मुकेश सिंह यांनी सांगितले की, खराब हवामान असूनही, सुरक्षा दलांनी राजौरी शहरापासून ७५ किमी अंतरावर असलेल्या भागाला रात्रभर वेढा घातला आणि सकाळी आसपासच्या भागात शोध तीव्र केला.नॉर्थ टेक सिम्पोजियम २०२३ च्या कार्यक्रमादरम्यान, नॉर्दर्न आर्मी कमांडर लेफ्टनंट उपेंद्र द्विवेदी यांनी या चकमकीबाबत सांगितले की, पाकिस्तान पुन्हा एकदा या प्रदेशात दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तान खोऱ्यातील शांतता बिघडवण्यासाठी सीमेपलीकडून कट्टरपंथी बंदूकधारी पाठवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आम्ही पाकिस्तानचे नापाक मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही.

दरम्यान या वर्षात आतापर्यंत २६ दहशतवादी मारले गेले आहेत. तसेच १० सुरक्षा जवानही हुतात्मा झाले. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, सुरक्षा दलांना या परिसरात ३-४ दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर तेथे शोधमोहीम राबवण्यात आली. छाप्यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यानंतर चकमक सुरू झाली.

दोन संशयित पळून जाण्यात यशस्वी

सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, ११ सप्टेंबरच्या संध्याकाळी पत्राडा येथील जंगल परिसरात शोध आणि घेराबंदी मोहीम सुरू करण्यात आली. दोन व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली पाहता काही गोळीबार करण्यात आला. मात्र, दोन्ही संशयित पळून जाण्यात यशस्वी झाले.

दरम्यान काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कराने १५ ऑगस्टपूर्वी संयुक्त कारवाईदरम्यान ६ दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून दारूगोळा आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पहिले प्रकरण ९ ऑगस्टच्या रात्रीचे आहे, जिथे कोकरनागच्या अथलन गडोले येथे तीन दहशतवाद्यांना पकडण्यात आले होते. या चकमकीत लष्कराच्या जवानासह तीन जण जखमी झाले.

दुसरे प्रकरण बारामुल्ला येथील उरीचे आहे, जिथे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लष्कराच्या 3 दहशतवाद्यांना पकडले. त्यांच्यावर यूएपीए आणि आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामुल्ला पोलीस आणि लष्कराच्या 16 शीख लाइट इन्फंट्रीच्या सुरक्षा दलांनी चुरुंडा उरी येथे गस्त घालताना एका संशयिताला पाहिले. सुरक्षा दलांना पाहून तो पळू लागला, मात्र सुरक्षा दलांनी त्याला पकडले. शौकत अली अवान असे त्याचे नाव असून तो उरी येथील रहिवासी आहे. त्याच्याकडून दोन ग्रेनेड जप्त करण्यात आले. 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.