नवी दिल्ली : हिवाळ्यात वाढणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या कृती योजनेअंतर्गत दिल्ली सरकारने राजधानीत फटाक्यांची निर्मिती, विक्री, साठवणूक आणि वापरावर बंदी घातली आहे. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत यंदाच्या दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी असेल. वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने सोमवारी हा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी यासंदर्भात निर्देश जारी केले आहेत.