महापुरुषांच्या अवमान प्रकरणी साताऱ्यात दोन गटांमध्ये राडा!

    11-Sep-2023
Total Views |
 
Satara
 
 
मुंबई : साताऱ्यातील खटाव तालुक्यात असणाऱ्या पुसेसावळी गावात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी दोन गटात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. यामुळे पुसेसावळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री 9.30 च्या सुमारास सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे हा संपूर्ण प्रकार घडला. या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला.
 

Satara  
 
याबाबतची माहिती मिळताच सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रित आणली आहे. सध्या घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे साताऱ्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
 

Satara  
 
पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापु बांगर व आतर वरिष्ठ पोलिस आघिकारी पुसेसावळी परिसरात तळ ठोकून आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सातारा पोलिस मुख्यालयातून मोठा पोलिस फौजफाटा पुसेसावळी गावाकडे पाठवण्यात आला आहे. जमावाने त्याच परिसरातील एका प्रार्थनास्थळाच्या दिशेने चाल केली. यावेळी त्या प्रार्थनास्थळामध्ये सात ते आठ जण प्रार्थनेसाठी जमले होते. आक्रमक जमावाने प्रार्थनास्थळात घुसून आतमधील युवकांना मारहाण केली आहे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.