ओडिशाला मिळाली पहिली एआय जनरेटेड न्यूज अँकर - पहा व्हीडिओ

    12-Jul-2023
Total Views |
odisha gets 1st ai generated news anchor

मुंबई
: खाजगी वृत्तवाहिनी ओडिशा टीव्हीने 'लिसा' नावाची एआय-जनरेट केलेली न्यूज अँकर लाँच केली. ओडिशाच्या हातमागाची साडी घातलेली एक कृत्रिम महिला OTV नेटवर्कच्या टेलिव्हिजन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी ओडिया आणि इंग्रजी दोन्ही भाषेत बातम्या सादर करेल, असे कंपनीच्या प्रकाशनात म्हटले आहे. तशा पध्दतीचा व्हिडीओ कंपनीकडून प्रसारित करण्यात आला आहे. "तथापि, त्यावर काम करत असून तिला इतरांशी सहज संवाद साधता येईल अशा स्तरावर प्रशिक्षित करण्याचे आमचे प्रयत्न सुरु असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

 
कंपनी बिझनेस हेड लितिशा पांडा म्हणाल्या, ओडिया भाषेतून एआय अँकर टेलिव्हिजनच्या माध्यमातून लोकांसमोर आणणे हे खुपच कठीण काम होते. ते काम आम्ही आता साध्य केले असून तशा पध्दतीचे प्रशिक्षण दिले आहे. ते प्रशिक्षण देणं हे खरचं आव्हानात्मक होतं असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, एआय अँकरला प्रशिक्षण देण्याचे कार्य सुरु असून ते पुढील काही दिवस सुरु राहील, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. तसेच, येत्या काही दिवसात उडिया भाषेवर प्रभुत्व मिळविण्यात यश मिळू शकते असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121