२०१३नंतर बदलला भारत, हे १० मोठे आर्थिक बदल कारणीभूत! : मॉर्गन स्टॅनलीचा अहवाल

    01-Jun-2023
Total Views |
 
 
Morgan Stanley Report
 
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बदलला असून आज जागतिक क्रमवारीत स्थान मिळवण्याच्या मार्गावर आहे. मॉर्गन स्टॅनली या यूएस जागतिक गुंतवणूक बँकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात भारताच्या कायापालटाची माहिती देणारा अहवाल समोर आणला आहे. मॉर्गन स्टॅन्ले अहवाल सरकारच्या धोरणात्मक निवडीमुळे, विशेषत: २०१४ पासून भारतामध्ये कसे महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत यावर प्रकाश टाकतो.
 
"हा भारत २०१३ मध्ये होता त्यापेक्षा वेगळा आहे. १० वर्षांच्या अल्प कालावधीत, भारताने जागतिक क्रमवारीत स्थान मिळवले आहे." असे अहवालात म्हटले आहे. How India Has Transformed in Less than a Decade हा अहवाल, १० मोठ्या बदलांवर प्रकाश टाकतो, भारतीय अर्थव्यवस्थेच्या विश्लेषणाच्या आधारे, स्टॅन्लेने आपल्या अहवालात देशांतर्गत धोरणे आणि आंतरराष्ट्रीय गतिमानता या दोन्ही बाबतीत भारतासाठी अंदाज वर्तवले आहेत.
 
अहवाल दाखल करताना समाविष्ट केलेल्या १० प्रमुख बदलांपैकी, सप्लाय साइड पॉलिसी सुधारणा, अर्थव्यवस्थेचे औपचारिकीकरण, रिअल इस्टेट (नियमन आणि विकास) कायदा, सामाजिक हस्तांतरणाचे डिजिटायझेशन, दिवाळखोरी , चलनवाढ लक्ष्यीकरण, FDI, 401 योजना यांचा समावेश आहे. गेल्या १० वर्षांत भारतातील कॉर्पोरेट कर दर 25 टक्क्यांपेक्षा कमी आहे, पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने, संशोधनात राष्ट्रीय महामार्ग, ब्रॉडबँड ग्राहक आधार, ऊर्जा आणि रेल्वे मार्ग यासारख्या घटकांवर चर्चा करण्यात आली आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.