मुस्लीम मुलीसोबत हॉटेलमध्ये नाश्ता केला म्हणून कट्टरपंथींची मुलाला मारहाण!

मुलीलाही धमकावले! म्हणाले "मुलांसोबत फिरणे म्हणजे हराम"

    26-May-2023
Total Views |
 
chikkaballapur case
 
 
चिक्कबल्लापूर : काही दिवसांपासून मुस्लिम मुलींना हिंदूंसोबत पाहिल्याबद्दल कट्टरपंथीयांकडून मारहाण आणि अत्याचार केल्यांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. कर्नाटकातील चिक्कबल्लापूर येथे गुरुवारी 25 मे 2023 रोजी एका हिंदू तरुणाला मुस्लिमांच्या एका गटाने मारहाण केली. मुस्लिम तरुणीसोबत फूड स्टॉलवर नाश्ता करत असताना बेदम मारहाण करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, एका हिंदूसोबत फिरायला आणि नाश्ता करत असल्याच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आली. पोलिसांनी आरोपी मुस्लिमांचा शोध सुरू केला आहे.
 
मुस्लिम तरुणी तिच्या हिंदू मित्रासोबत नाश्ता करण्यासाठी गोपिका चाट नावाच्या फूड स्टॉलवर गेली होती. इकडे आरोपींची नजर त्यांच्यावर पडली. मुलगा हिंदू असल्याचे त्यांना समजले आणि भांडण सुरु झाले. मुलीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मुलाला मारहाण करणाऱ्या आरोपींना समजवण्याचा प्रयत्न केला की मुलगा फक्त मित्र आहे, परंतु तिचे ऐकले नाही. उलट मुलीला मध्यस्थी करताना पाहून ते संतापले. आरोपी मुलीला म्हणाले, "हिंदू मुलासोबत नाश्ता करायला जाणे हा गुन्हा आहे. याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे." यानंतर पीडितेने पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांनी तिला माफी मागण्यास भाग पाडले. व्हायरल व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
 
अलीकडे अशा अनेक घटना घडल्या आहेत, जेव्हा मुस्लिम मुलींना हिंदूंसोबत पाहिल्याबद्दल इस्लामिक गटांकडून अशोभनीय रीतीने मारहाण करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये यासाठी एक टीम तयार करण्यात आली होती. या टीमचे काम परिसरात फिरून हिंदूंसोबत मुस्लिम मुलींचे व्हिडीओ बनवून मुलीच्या कुटुंबीयांना माहिती देणे हे होते. या प्रकरणी यूपी पोलिसांनी अल्तमास, फरदीन, मोहम्मद अनस आणि बिट्टू उर्फ ​​आमिर यांना अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.