राहुल गांधींना सर्वसाधारण पासपोर्ट देण्याचे दिल्ली न्यायालयाचे आदेश

    26-May-2023
Total Views |
Rahul Gandhi Diplomatic Passport

नवी दिल्ली
: मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवलेले राहुल गांधी यांचा ‘डिप्लोमॅटिक पासपोर्ट’ जमा करण्यात आला आहे. त्यांना सर्वसाधारण पासपोर्ट देण्यास हरकत नसल्याचे दिल्ली न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे राहुल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन पासपोर्ट मिळवण्यासाठी राहुल दिल्ली न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) तीन वर्षांसाठी वैध असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी वैभव मेहता यांनी गांधींच्या याचिकेला अंशतः परवानगी दिली.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.