राज्याच्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज

सातव्या वेतन आयोगाची थकबाकी जमा होणार जूनच्या पगारात

    25-May-2023
Total Views |
Seventh Pay Commission maharashtra

मुंबई
: राज्य सरकारी कर्मचाऱ्यासाठी महत्त्वाची बातमी मिळत आहे. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी जूनच्या पगारात मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या तरतूदींनुसार थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना पगारातून दिली जाणार आहे. तसेच भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाईल किंवा पगारातून रोखीतून दिली जाईल, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, राज्य कर्मचारी, निवृत्त राज्य कर्मचारी तसेच जिल्हा परिषद, अनुदानित शाळा यांना या सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. निवृत्त वेतनधारकांना ही थकीत रक्कम कर्मचाऱ्यांप्रमाणेच जूनच्या निवृत्तीवेतनात मिळणार आहे. आणि अनुदानित शाळा, जिल्हा परिषद यांसारख्या कर्मचाऱ्यांना थकबाकी ही भविष्य निर्वाह निधी किंवा रोखीने मिळण्याची शक्यता आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.