राज्यातील १२ वीचा निकाल ९१.२५ टक्के; कोकण विभाग अव्वल!
- यंदाही निकालात मुलींची बाजी
25-May-2023
Total Views | 169
मुंबई : राज्यातील १२ वीचा निकाल ९१.२५ टक्के लागला असुन, मुलींनीच यंदाही बाजी मारली आहे. बारावीच्या निकालात यंदाही कोकण विभाग अव्वल आहे. तर सर्वात कमी मुंबईचा निकाल आहे. दुपारी २.०० वाजता हा निकाल अधीकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे.
Maharesult.nic.in
hsc.maharesult.org.in
hscresult.mkcl.org
या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. निकालासाठी आता काही तास उरले आहेत. महाराष्ट्र स्टेट बोर्डकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, निकाल घोषीत करण्याची संपूर्ण तयारी झाली आहे. लवकरच निकाल घोषित करण्यात येईल. निकाल लागल्यानंतर काही दिवसातच विद्यार्थ्यांना त्यांचे ओरिजीनल मार्कशीट कॉलेजमध्ये मिळतील.