नाशिकमधील बिबट्या वनविभागाच्या पथकाकडुन जेरबंद

    23-May-2023
Total Views | 55




leopard rescue nashik


मुंबई (विशेष प्रतिनिधी):
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळदमध्ये एक बिबट्याला जेरबंद करण्यात वनखात्याला यश मिळाले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात शिरलेल्या या बिबट्याचा नीगरिकांना त्रास होत असल्याने गेल्या महिनाभरापासुन या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न चालु होते.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद, धुमोडी, वेळुंजे, ब्राम्हणवडे या गावांमध्ये मानव-बिबट संघर्षाच्या काही घटना घडल्या होत्या. नाशिक पश्चिम वनविभागाच्या पथकामार्फत गेले अनेक दिवस बिबट्याला पकडण्याच्या प्रयत्नांना आता यश मिळाले आहे.
या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे आणि कॅमेरा ट्रॅप्स लावण्यात आले होते. सोमवारी सकाळी हा बिबट शेतात असल्याचे लक्षात येताच वन विभागाच्या बचाव पथकाने बिबट्यावर जाळी टाकुन व त्यानंतर डार्ट मारुन त्याला जेरबंद केले. हा बिबट्या सध्या वनविभागाच्या अखत्यारीत असुन त्याला अभयारण्यात सोडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती वनविभागाकडुन देण्यात आलेली आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121