इंडियाSss! इंडियाSss! मोदींनी दणाणून सोडलं सिडनी स्टेडिअम!

    23-May-2023
Total Views |
 
Narendra modi
 
 
सिडनी : ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियाSss! इंडियाSss! चा गजर केला. सिडनीच्या ऑलिम्पिक पार्कमध्ये २३ मे रोजी 'मोदी-मोदी'चा आवाज घुमला. पंतप्रधान मोदींनी येथे २० हजारांहून अधिक भारतीयांना संबोधित केले. ऑस्ट्रेलियाचे पीएम अँथनी अल्बानीज म्हणाले की, "पीएम मोदी हे बॉस आहेत!" भारतीय समुदायाने पंतप्रधानांचे जोरदार स्वागत केले. ऑस्ट्रेलियात मोदींच्या उपस्थितीत सिडनीच्या पश्चिमेकडील हॅरिस पार्कचे नामकरण 'लिटिल इंडिया' करण्यात आले. हॅरिस पार्कमधील जवळजवळ प्रत्येक व्यक्ती भारतीय आहे.
 
परदेशातील भारतीयांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "ऑस्ट्रेलियात भारतीय जनतेविषयी खूप प्रेम आहे. ऑस्ट्रेलियाशी आमचं नातं ऐतिहासिक आहे. आमच्याकडे भाषा वेगळी बोलली जात आहे, तरी सुध्दा आम्ही त्यांच्या जोडलो आहोत. मी 2014 मध्ये आलो, तेव्हा मी तुम्हाला वचन दिले होते की, तुम्हाला पुन्हा भारताच्या कोणत्याही पंतप्रधानासाठी 28 वर्षे वाट पाहावी लागणार नाही. आज सिडनीमध्ये, या रिंगणात, मी पुन्हा उपस्थित आहे आणि मी एकटा आलेलो नाही. पंतप्रधान अल्बानीजही माझ्यासोबत आले आहेत."
 
"ऑस्ट्रेलिया आणि भारतातील लोकांमधील खोल संबंध आहेत. अल्बेनीज जेव्हा मी मार्चमध्ये भारतात होतो, तेव्हा गुजरातमध्ये होळी साजरी करणे, दिल्लीत महात्मा गांधींना पुष्पांजली अर्पण केली, ही अविस्मरणीय क्षणांनी भरलेली एक सहल होती. मी जिथेही गेलो, तिथे मला ऑस्ट्रेलिया आणि भारतातील लोकांमध्ये घट्ट नाते असल्याचे जाणवले. तुम्हाला भारत समजून घ्यायचा असेल तर ट्रेन आणि बसने प्रवास करा." असं पंतप्रधान म्हणाले.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.