श्रीराम मंदिराचा पहिला टप्पा डिसेंबरमध्ये पूर्ण होणार
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांची माहिती
23-May-2023
Total Views | 43
नवी दिल्ली : अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीस्थळी भव्य श्रीराम मंदिराच्या उभारणीतील पहिला टप्पा ३० डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर भाविकांना दर्शन घेता येईल, अशी माहिती श्रीरानजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिली आहे. श्रीराम मंदिराच्या पहिल्या टप्प्यात तळमजल्याचे बांधकाम ३० डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. तळमजल्यावर पाच मंडप असणार आहेत, यामध्ये सर्वांत महत्वाचे असे गर्भगृह असून तेथे भगवंताची मूर्ती स्थापित केली जाणार आहे. पहिला टप्पा येत्या डिसेंबरअखेर पूर्ण झाल्यानंतर भाविकांना दर्शन घेता येणार आहे. त्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याचे बांधकाम ३० डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे, असे ट्रस्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी म्हटले आहे.
तळमजल्यावरील पाच मंडपांमध्ये १६० स्तंभ असल्याचे नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, त्यावर त्यामध्ये मूर्तिशास्त्राचे (प्रतिमा व चिन्हे) काम पूर्ण करायचे आहे. मंदिराच्या तळमजल्यावर भागात रामाचे संदर्भ असतील. या मजल्यावर वीज आणि इतर सुविधा पूर्ण करायच्या असून अतिशय वेगवान काम सुरू असल्याचेही मिश्रा यांनी यावेळी नमूद केले आहे.