महाराष्ट्रातील ७० हून अधिक उमेदवार यशस्वी ; युपीएससीचा निकाल जाहीर

    23-May-2023
Total Views |
Central Public Service Commission result

नवी दिल्‍ली
:केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातील एकूण ९३३ उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील ७० हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास १२ टक्के महाराष्ट्रातून आहेत. राज्यातून कश्मिरा संख्ये प्रथम तर देशात तिने २५ वा क्रमांक पटकाविला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष २०२२ च्या मुख्य परिक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या १०० उमेदवारांमधे महाराष्ट्रातील ७ पेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश आहे.

(२५) कश्मिरा संखे, (२८) अंकिता पुवार, (५४) रूचा कुलकर्णी, (५७) आदिती वषर्णे, (५८) दिक्षिता जोशी, (६०) श्री मालिये, (७६) वसंत दाभोळकर, (११२) प्रतिक जरड, (१२७) जान्हवी साठे, (१४६) गौरव कायंडेपाटील, (१८३) ऋषिकेश शिंदे, (२१४) अर्पिता ठुबे, (२१८) सोहम मनधरे, (२६५). दिव्या गुंडे, (२६६) तेजस अग्निहोत्री, (२७७) अमर राऊत, (२७८) अभिषेक दुधाळ, (२८१) श्रुतिषा पाताडे, (२८७) स्वप्निल पवार, (३१०) हर्ष मंडलिक, (३४८) हिमांषु सामंत, (३४९) अनिकेत हिरडे, (३७०) संकेत गरूड, (३८०) ओमकार गुंडगे (३९३) परमानंद दराडे, (३९६) मंगेश खिल्लारी, (४१०) रेवैया डोंगरे (४४५) सागर खरडे, (४५२) पल्लवी सांगळे (४६३) आशिष पाटील, (४७०) अभिजित पाटील, (४७३) शुभाली परिहार, (४९३) शशिकांत नरवडे, (५१७) रोहित करदम, (५३०) शुभांगी केकण, (५३५) प्रशांत डगळे, (५५२) लोकेश पाटील, (५५८) ऋतविक कोत्ते, (५६०) प्रतिक्षा कदम, (५६३) मानसी साकोरे, (५७०) सैय्यद मोहमद हुसेन, (५८०) पराग सारस्वत, (५८१) अमित उंदिरवडे, (६०८) श्रुति कोकाटे, (६२४) अनुराग घुगे, (६३५) अक्षय नेरळे, (६३८) प्रतिक कोरडे, (६४८) करण मोरे, (६५७) शिवम बुरघाटे, (६६३) राहुल अतराम, (६६५) गणपत यादव, (६६६) केतकी बोरकर, (६७०) प्रथम प्रधान, (६८७) सुमेध जाधव, (६९१) सागर देठे, (६९३) शिवहर मोरे, (७०७) स्वप्निल डोंगरे, (७१७) दिपक कटवा, (७१९) राजश्री देशमुख, (७५०) महाऋद्र भोर, (७६२)अकिंत पाटील, (७९०) विक्रम अहिरवार, (७९२) विवेक सोनवणे, (७९९) स्वप्निल सैदाने, (८०३) सौरभ अहिरवार, (८२८) गौरव अहिरवार, (८४४) अभिजय पगारे, (८६१) तुषार पवार, (९०२) दयानंद तेंडोलकर, (९०८) वैषाली धांडे, (९२२) निहाल कोरे.


23 May, 2023 | 20:44

एक नजर निकालावर

केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी सप्टेंबर २०२२ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली. जानेवारी-मे २०२३ दरम्यान परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण ९३३ उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (ओपन) गटातून –३४५, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) ९९, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून(ओबीसी) – २६३, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – १५४, अनुसूचित जमाती प्रवर्गातून – ७२ उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये ४१ दिव्यांग उमेदवारांचा (१४ ऑर्थोपेडिकली अपंग, ०७ दृष्टीहीन, १२ श्रवणदोष आणि ०८ एकाधिक अपंग) समावेश आहे. लोकसेवा आयोगाने १७८ उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List) तयार केली आहे. यामध्ये सामान्य गट- ८९, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)- २८, इतर मागास वर्ग -५२, अनुसूचित जाती- ०५, अनुसूचित जमाती-०४ उमेदवारांचा समावेश आहे.

...या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू

भारतीय प्रशासन सेवा (आय.ए.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण -१८० जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (जनरल) – ७५, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) १८ इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) –४५, अनुसूचित जाती (एस.सी.) – २९, अनुसूचित जमाती (एस.टी.) – १३ जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाईल.

भारतीय विदेश सेवा (आय.एफ.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण – ३८ जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – १५, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) ०४, इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) – १०, अनुसूचित जाती (एस.सी.) – ०६, अनुसूचित जमाती (एस.टी.) – ०३ जागा रिक्त आहेत.

भारतीय पोलिस सेवा (आय.पी.एस.) या सेवेमध्ये एकूण – २०० जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – ८३, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) २०, इतर मागास प्रवर्गातून - ५३, अनुसूचित जाती प्रवर्गातून - ३१, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – १३ उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.

केंद्रीय सेवा गट अ - या सेवेमध्ये एकूण - ४७३ जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) - २०१, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) ४५ , इतर मागास प्रवर्गातून - १२२, अनुसूचित जाती प्रवर्गातून - ६९ तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून –३६ उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.

केंद्रीय सेवा गट ब - या सेवेमध्ये एकूण – १३१ जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) - ६०, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) १२ उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून - ३३, अनुसूचित जाती प्रवर्गातून – १९ तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – ०७ उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

एकूण ९३३ उमेदवारांपैकी ६१३ पुरुष आणि ३२० महिलांचा विविध सेवांमध्ये नियुक्तीसाठी आयोगाने शिफारस केली आहे, तर १०१ उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरुपाची असेल.

अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.