अभिनेत्री मुक्ता बर्वे 'या' नाट्यगृहाबद्दल म्हणते...
22-May-2023
Total Views | 185
17
मुंबई : अभिनेता भरत जाधव सध्या ' तू तू मी मी' या नाटकाच्या रत्नागिरीतील प्रयोगामध्ये नाट्यगृहाची दूरावस्था पाहून मी रत्नागिरीत पुन्हा प्रयोग करणार नाही, असे विधान दि. २० मे रोजी केले होते. मात्र आता याउलट नाट्यगृहातील सोईसुविधांचे कौतुक करणारा व्हिडीओ अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. त्यात ती म्हणते की, काही काही नाट्यगृहाची अवस्था खूपच दयनीय आहे. मात्र नवी मुंबईतील वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह खूपच सुंदर असं आहे. हे महापालिकेचे नाट्यगृह असलं तरीदेखील अद्याप सुंदर असल्याचं तिने म्हटले आणि मुक्ता बर्वे हिने विष्णुदास भावे नाट्यगृहाची प्रशंसा केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान भरत जाधव यांच्या विधानाची दखल मंत्री उदय सांमत यांनी घेत भरत जाधव यांच्याशी मी प्रत्यक्ष बोलणार असल्याचे सामंतांनी सांगितले.