२०००च्या नोटा बॅंकेत जमा करताय? तर नक्की वाचा!

    20-May-2023
Total Views |
 
2000 notes
 
 
मुंबई : २००० हजार रुपयांच्या नोटा खात्यात भरण्यासाठी RBIने परवानगी दिली असली तरी रोख रकमेचे कोणतेही मोठे व्यव्हार, आयकर खात्याच्या छाननीखाली येऊ शकतात. असा इशारा सीए चिराग राऊत यांनी दिला आहे. बँकानी या नोटा मंगळवार पासुन बदलुन द्याव्यात असं म्हटलं आहे. मात्र या नोटा कशाप्रकारे बदलुन देणार याचे परिपत्रक अद्याप आले नाही.
 
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००० रूपयांच्या नोटा परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या नोटा व्यवहारात सुरूच राहणार आहेत. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले असल्याचे वृत्त 'पीटीआय'ने दिले होते. ३० सप्टेंबरनंतर या नोटा बंद केल्या जातील. २०१६ मध्ये नोटबंदीनंतर २००० हजार रुपयांची नोट चलनात आली होती. त्यावेळी ५०० आणि १०० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. लक्षणीय बाब म्हणजे आता २००० च्या नोटांची छपाई बंद होणार आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.