संपूर्ण क्षत्रिय कुळाचा संहार करण्याचा ज्याने अनेक वेळा प्रयत्न केला त्या परशुरामाची आज जयंती. जन्माने ब्राम्हण आणि क्षत्रिय असलेल्या परशुरामाला सर्व क्षत्रियांचा नाश करावा या इचछेने पछाडले होते. यामागे बऱ्याच आख्यायिका आहेत. आपले वडील जमदग्नी यांनी पत्नी रेणुकेला मारण्याचा आदेश परशुरामास दिला होता. वडिलांचा आदेश शिरसावंद्य मानून त्याने आपल्या मातेचे मुंडके छाटले व उशाप मागून तिला पुनर्जीवित केले. या दिवसापासून त्यांच्या मनात हिंसेविषयी घृणा दाटून आली.
भगवान शंकरांकडून त्यांनी परशू हे शस्त्र घेतले आणि अनेक विद्या आत्मसात केल्या. त्याच विद्यांच्या जोरावर त्यांनी दुष्ट आणि प्रजेला जाच करणाऱ्या राजांचा बंदोबस्त केला. त्याच वेळी त्यांनी सहस्रार्जुनाला ठार केले. पुढे राजांना जिंकून ताब्यात घेतलेली जमीन त्यांनी ऋषिकुलाला देऊन ते महेन्द्र पर्वतावर तप करण्यासाठी निघून गेले.
क्षत्रिय कुळाचा नाश करण्याच्या अट्टाहासापायी त्यांनी एकदा रामाची वाट अडवली. राम सीतेचे स्वयंवराहून परतत होते. परंतु राग शांत झाल्यावर परशुरामांनी आवळे धनुष्य रामास भेट दिले. परशुरामाच्या या मंदिराच्या रचनेमध्ये मोगल वास्तुकलेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. विशेषतः मंदिराचे घुमट बघतांना ते प्रकर्षाने जाणवते. या मंदिराचे घुमट सरळ उतार असलेले अष्टकोनाकृती आहेत. आणि उंच कळस तसेच मंदिरातल्या शिल्पकृती हे मिश्रण स्पष्टपणे दाखवतात. उपलब्ध पुराव्यानुसार इथला तिसरा घुमट हा आदिलशहाच्या बेगमांपैकी एकीने उभारला आहे.