सर ज. जी. कला महाविद्यालयामध्ये १४ मार्चपासून कला प्रदर्शनाचे आयोजन

    09-Mar-2023
Total Views | 60

jj college 
 
मुंबई : सर ज. जी. कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या निवडक कलाकृतींचे प्रदर्शन संपन्न होणार आहे. हे प्रदर्शन १४ ते २१ मार्च २०२३ या कालावधीत सकाळी १० ते सायं. ७ या वेळेत संस्थेच्या कला दालनामध्ये भरविण्यात येणार आहे. पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवीचे पेंटिंग, मातीकाम, धातूकाम, अंतर्गत गृह सजावट, शिल्पकला, वस्त्रसंकल्प व कला शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी गत वर्षभरात तयार केलेल्या कलाकृतींमधील निवडक कलाकृती या प्रदर्शनातून पाहायला मिळतील. कला रसिकांना हे प्रदर्शन पाहण्यासाठी विनामूल्य उपलब्ध असल्याचे महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. वि. डों. साबळे यांनी स्पष्ट केले आहे.
 
या प्रदर्शनानिमित्त १६ मार्च २०२३ रोजी सायं. ५.३० वाजता पंडित उपेंद्र भट यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. कला प्रदर्शनाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. साबळे यांनी केले आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121