कल्याण-डोंबिवलीत उत्साहाला गालबोट

    08-Mar-2023
Total Views |
clash-between-two-groups-over-a-petty-dispute-in-dombivali
 

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत मंगळवारी सकाळपासूनच नागरिकांमध्ये धुळवडीचा उत्साह दिसून आला. मोठ्यांपासून अगदी लहान मुलांनीही रंगाची उधळण करत धुळवड साजरी केली. मात्र, डोंबिवलीतील आजदे पाडा येथे या उत्साहाला गालबोट लागले. आजदेपाडा परिसरात फुगे फेकण्यावरून दोन गटांत तुफान राडा झाला. सोमवारी रात्रीच्या सुमारास अतिउत्साही तरुणांमुळे रंगाचा बेरंग झाल्याचे पाहायला मिळाले. एका गटातील तरुणावर दुसर्‍या तरुणाने मुद्दाम फुगा फेकल्याने हा वाद झाला. या वादाचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. ही घटना ‘सीसीटीव्ही’त कैद झाली आहे. होळी आणि धुळवडीदरम्यान अनुचित प्रकार वा दुसर्‍याला त्रास होणार नाही, अशा पद्धतीने सण साजरा करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येऊनही काही अतिउत्साहींकडून रंगाचा बेरंग करण्याचा प्रयत्न झाला.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.