आज चैत्र नवरात्र समाप्ती अर्थात श्रीराम नवमी, जाणून घ्या श्रीराम नामाचा अर्थ
30-Mar-2023
Total Views | 121
5
मुंबई : अयोध्येत सर्व नगरवासी सुखी आणि आनंदी जव जगात होते परंतु राजाला पुत्र नाही पर्यायाने वारस नाही ही चिंता मधून मधून डोके वर काढतच होती. अशात यज्ञ करून नवसा सायासाने पुत्र रत्न प्राप्त झाले. अग्निदेवतेने पायसदान देऊन राणी गर्भवती राहिली. कित्येक वर्षाने झालेला पहिला पुत्र म्हणून कौसल्येचा पुत्राचे सर्व लाड व कौतुक केले गेले. त्याचे नामकरण करतानाही अनेक गोष्टींचा, अयोध्येच्या भविष्याचा आणि राजकुटुंबाचा विचार करण्यात आला.
रघु कुळाचे गुरु ऋषी वसिष्ठ यांनी अनेक विचारांती प्रथम पुत्राचे नामकरण 'राम' असे ठेवले. या दोनाक्षरी शब्दातून शांती निर्माण होते. मनःशांती प्राप्त होते. अग्नी आणि अमृत या दोन तत्वांच्या बीजाक्षरांनी राम हे नामाभिधान तयार होते. त्याच्या सतत उच्चरवाने मनाला शक्ती प्राप्त होते तसेच शक्ती प्राप्त झाल्याने मनःशांती लाभते.