अमृता फडणवीसांना धमकी प्रकरणात मोठी अपडेट

    16-Mar-2023
Total Views |

Amruta Fadnavis (1)

(Amruta Fadnavis)


उल्हासनगर
: अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनिल जयसिंघानीच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीसांनी तपासचक्र फिरवले आहेत. या अंतर्गत आता मुंबई पोलीसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे. जयसिंघानीच्या उल्हासनगरातील घरी हा छापा टाकण्यात आला. बुकी जयसिंघानीची मुलगी अनिक्षा आणि मुलगा घरी आहेत, अशी माहिती आहे.

आत्तापर्यंतची ही मोठी कारवाई मानली जात आहे. जयसिंघानीविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात आता मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. सिंघानिया सात ते आठ वर्षे पोलीसांना चकवा देत आहे. त्याच्याविरोधात पाच राज्यातील पोलीस मागावर आहेत. ईडीच्याही रडारवर सिंघानिया होता. आता कुटूंबियांकडून पुढील तपास करून सिंघानियाच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला जात आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.