स्वदेशी ‘पॉवर टेक ऑफ शाफ्ट’मुळे ‘तेजस’ होणार गतीमान
15-Mar-2023
Total Views | 157
29
नवी दिल्ली : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (डिआरडीओ) लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए तेजस) लिमिटेड सीरिज प्रोडक्शन (एलएसपी - ३) विमानांवर पॉवर टेक ऑफ शाफ्टची (पीटीओ शाफ्ट) पहिली उड्डाण-चाचणी यशस्वीपणे केली आहे. या पॉवर शाफ्टची निर्मिती चेन्नईस्थित कॉम्बॅट व्हेईकल्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटद्वारे करण्यात आली आहे.
पीटीओ शाफ्ट हा विमानातील एक महत्त्वाचा घटक असतो. डिआरडीओने त्याची निर्मिती करून मोजक्याच देशांकडे असलेले अतिशय जटिल असे हायस्पीड रोटर तंत्रज्ञानही प्राप्त केले आहे. या पीटीओ शाफ्टमुळे भारताच्या भविष्यातील अत्याधुनिक स्वदेशी लढाऊ विमानांच्या प्रकल्पास गती प्राप्त होईल. त्याचप्रमाणे या स्वदेशी तंत्रज्ञानामुळे खर्च आणि वेळेचीही बचत होणार आहे.
पीटीओ शाफ्टची रचना एका अनोख्या आणि नाविन्यपूर्ण पेटंट 'फ्रिक्वेंसी स्पॅनिंग टेक्नॉलॉजी'सह करण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे त्यास विविध ऑपरेटिंग इंजिन गती प्राप्त करण्यास सक्षम करते. लाइटवेट हाय स्पीड, लुब्रिकेशन मुक्त पीटीओ शाफ्ट विमानाच्या इंजिन गिअर बॉक्स आणि एअरक्राफ्ट माउंट केलेल्या ऍक्सेसरी गियर बॉक्स दरम्यान उच्च शक्ती प्रसारित करते. यामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेस बळ प्राप्त होणार आहे.
संरक्षण मंत्र्यांनी केले कौतुक
पीटीओ शाफ्टची यशस्वी निर्मिती हा 'आत्मनिर्भर भारत' च्या दिशेने आणखी एक मोठा टप्पा आहे. या यशामुळे देशाची संशोधन क्षमता पुन्हा सिद्ध झाली असून यामुळे स्वदेशी लढाऊ विमाने निर्मितीस गती येणार आहे.