अधिक उत्पादनाने कांदा दरात घसरण : भुसे

    11-Mar-2023
Total Views |
Dada Bhuse


नाशिक
: पाकिस्तान, बांगलादेश येथे आर्थिक चणचण असल्याने त्यांच्याकडून कांद्याची आयात थांबली आहे, तर नाशिकसह इतर जिल्ह्यातदेखील कांदा उत्पादन यंदा झाल्याने दर घसरले असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.


दादा भुसे पुढे म्हणाले की, “शेतकर्‍यांना दर कमी मिळत आहे ही वस्तुस्थिती आहे. ‘नाफेड’च्या माध्यमातून सव्वा लाख टन खरेदी टार्गेट देण्यात आले आहे. ही खरेदी प्रगतिपथावर असून, ४०० रुपयांपासून ८०० रुपये होते. आठ दिवसांत ‘नाफेड’कडून खरेदी सुरू झाल्यानंतर १५० ते २०० रुपये इतकी वाढ दरात झाली आहे. ‘फार्मर प्रोड्युसर’कंपन्यांना देखील खरेदी करण्याची विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘नाफेड’बाबत तक्रार करण्यात येत असून, त्याबाबत चौकशी केली जाणार आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.