पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ डिसेंबरला महाराष्ट्रात!

    02-Dec-2023
Total Views | 45
Narendra Modi news


नवी दिल्ली
: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या हस्ते सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी ४ वाजता सिंधुदूर्ग येथे पोहोचतील आणि राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. त्यानंतर सिंधुदूर्ग येथे 'नौदल दिन 2023' कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहतील. पंतप्रधान भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांची प्रात्यक्षिके सिंधुदुर्गातील तारकर्ली किनाऱ्यावरून पाहतील.

दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. सिंधुदूर्ग येथील 'नौदल दिन 2023' हा सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समृद्ध सागरी वारशाला आदरांजली अर्पण करत आहे. पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आय. एन. एस. विक्रांतचे पंतप्रधानांनी जलावतरण केले, तेव्हा शिवरायांच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेत साकारण्यात आलेल्या नौदलाच्या नव्या ध्वजाचा भारतीय नौदलाने स्वीकार केला.

दरवर्षी, नौदल दिनानिमित्त, भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांद्वारे 'कार्यान्वयन प्रात्यक्षिके' आयोजित करण्याची परंपरा आहे. ही 'कार्यान्वयन प्रात्यक्षिके' लोकांना भारतीय नौदलाने हाती घेतलेल्या बहु-क्षेत्रीय मोहिमांचे विविध पैलू पाहण्याची संधी देतात.

पंतप्रधानांनी घेतली कतारच्या शासकांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल-थानी यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. द्विपक्षीय भागीदारीची शक्यता आणि कतारमधील भारतीय समुदायाच्या कल्याणाबाबत आमच्यात चांगली चर्चा झाली, असे पंतप्रधानांनी ‘एक्स’वर लिहिले आहे. कतारमध्ये आठ माजी भारतीय नौसैनिकांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्हे नेत्यांमध्ये झालेल्या भेटीस विशेष महत्त्व प्राप्त होते.


अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानात भीषण अन्नटंचाई! १.१ कोटी जनतेवर उपासमारीची वेळ, संयुक्त राष्ट्रांकडून धोक्याची घंटा

पाकिस्तानात भीषण अन्नटंचाई! १.१ कोटी जनतेवर उपासमारीची वेळ, संयुक्त राष्ट्रांकडून धोक्याची घंटा

(11 million stare at starvation in Pakistan) पाकिस्तानातील १.१ कोटी जनता तीव्र अन्नटंचाईच्या समस्येला तोंड देत आहेत, त्यापैकी अनेक जण उपासमारीच्या थेट उंबरठ्यावर आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने (FAO) शुक्रवार, दि. १६ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या ‘जागतिक अन्न संकट २०२५’ या अहवालातून ही धोकादायक स्थिती समोर आली आहे. या अहवालातून पाकिस्तानमध्ये विशेषतः बलुचिस्तान, सिंध आणि खैबर पख्तूनख्वा सारख्या संघर्षग्रस्त आणि उपेक्षित भागांमध्ये अन्नटंचाईची भीषण परिस्थिती ओढवल्याचे स्पष्ट झाले आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121