डोंबिवली: नेवाळी ते अंबरनाथ रस्त्याच्या बाजूला सुरू असलेल्या नाल्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून त्याबाबत वारंवार तक्रार करून देखील अधिकारी वर्गाकडून दुर्लक्ष केले जात आहे. अखेर अंबरनाथ शहराचे मनसे उपशहरप्रमुख असामउद्दीन खान यांच्याकडून अनोखे आंदोलन डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात करण्यात आले. यावेळी ठेकेदारांकडून धमकी दिली जात असल्याचा ही मनसेने आरोप केला आहे.
अंबरनाथ काटई रस्त्यावर नेवाळी ते अंबरनाथ रस्त्याच्या बाजूला ड्रेनेजचे एक काम सुरू आहे. या ड्रेनेजच्या कामात निष्काळजीपणा केला जात आहे. अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे असा आरोप मनसेक डून करण्यात आला आहे. यासंदर्भात मनसे उपशहरप्रमुख असामुद्दीन उर्फ बबलू खान यांनी एमआयडीसी अधिका:यास कळविले. खान यांचे म्हणणे आहे की, अधिका:यांना जागेवर पाहिले पाहिजे की काम कसे केले जात आहे. ज्या कामात लोखंडी दोन सळई वापरल्या पाहिजे. त्याठिकाणी लोखंडी एक सळई वापरली जात आहे. आता अवकाळी पाऊस झाला. त्या अवकाळी पावसात या कामाची काय परिस्थिती आहे. वारंवार तक्रार करून देखील अधिकारी लक्ष देत नसल्याने असामुद्दीन खान आणि संदीप भोईर यांच्या नेतृत्वात मनसेकडून डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात आंदोलन केले गेले. हातात बॅनर घेऊन एमआयडीसीचा निषेध व्यक्त करण्यात आला. या कामाची तक्रार खान यांनी केल्याने त्यांना ठेकेदाराने धमकाविले असल्याचा आरोप खान यांनी केला आहे. मनसेच्या आंदोलनानंतर एमआयडीसी जागी होणार की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.
यासंदर्भात एमआयडीसीचे अभियंता आनंद गोगटे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सुरूवातीला कामात निष्काळजीपणा होता. त्यानंतर कंत्रटदाराला नोटीस बजावली होती. व्हीजेटीआय अहवाल मागविला होता. त्याने तो अहवाल सादर केला आहे. त्यानुसार त्याठिकाणी काम सुरू आहे. सध्या काम व्यवस्थित सुरू आहे.
----------------------------------------------------