संजय राऊतांचा रशियन बहिणींसोबतचा फोटो दाखवायचा का?
- आमदार नितेश राणेंचा सवाल
21-Nov-2023
Total Views | 88
मुंबई : संजय राऊतांचा रशियन बहिणींसोबतचा फोटो दाखवायचा का? असा सवाल भाजप आ. नितेश राणेंनी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो ट्वीट केला होता. त्यानंतर राऊतांनी २७ फोटो अन् ३ व्हिडीओ असल्याचा दावा केला होता. यावर आता नितेश राणेंनी राऊतांना इशारा दिला आहे.
नितेश राणे म्हणाले, "बावनकुळेंनी काहीच चुकीचे केलेलं नाही. स्वतःच्या कुटुंबा बरोबर कोण एन्जॉय करत असेल तर काय वाईट? संजय राऊत बाहेर जाताना न्यूझीलंड हाऊस, रॉयल पाम ला जाताना स्वतःच कुटुंब घेऊन जातो का? तुझ्या मालकाचा मुलगा डिनो मोरिया च्या मांडीवर बसून कुठलं हळदीचं दूध प्यायचा? त्याचा ब्रँड सांगू का? रशियन बहिणी येऊन तुझा फॅमिली फोटो काढलेला तो आम्ही दाखवायचा का? महाराष्ट्राच राजकारण किती खालच्या थराला न्यायचं हे या माणसाला एकदा विचारलं पाहिजे." असं राणे म्हणाले आहेत.