मुंबई : खासदार राहुल शेवाळे यांच्या मातोश्री जयश्री रमेश शेवाळे यांचे दि. १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता निधन झाले. त्यावेळी त्या मानखुर्द येथील राहत्या घरात होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान डॉक्टरांनी उपचारांनंतर त्यांना दि. १६ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज दिला होता. त्यानंतर त्या मानखुर्द येथील घरीच होत्या, मात्र दि. १९ नोव्हेंबर रोजी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना चेंबूरच्या साई रुग्णालयात नेले. पण उपचारापुर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि.२० नोव्हेंबर रोजी चेंबूर येथील साई रुग्णालयात जाऊन शेवाळेंच्या मातोश्रींचे अंत्यदर्शन घेतले. तसेच शेवाळे कुटूंबियांचे सांत्वन केले.यावेळी खासदार राहुल शेवाळे यांचे बंधू, त्यांच्यासोबत काम करणारे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.