धक्कादायक! मुंबईत श्रद्धा वालकर घटनेची पूनरावृत्ती! सुटकेसमध्ये मृतदेह

    20-Nov-2023
Total Views |

Mumbai Police
 
मुंबई : मुंबईत सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांत दुसऱ्यांदा अशा प्रकारे सुटकेसमध्ये मृतदेह आढळला आहे. मुंबईच्या कुर्ला परिसरात मेट्रोच्या बांधकाम साइटजवळ ही सुटकेस सापडली असून अद्याप मृत महिलेची ओळख पटलेली नाही.
 
मिळालेल्या माहितीनुसार, शांती नगरमधील सीएसटी रोडवर एक संशयास्पद सुटकेस पडली असल्याची माहिती रात्री १२.३० वाजताच्या सुमारास पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सुटकेस उघडून बघितली असता त्यांना त्यात महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मृतदेह तात्काळ पोस्टमार्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला.
 
मृतदेहावरून महिलेचे वय साधारण २५ ते ३० वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, कुर्ला पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.
 
याआधीही जून महिन्यात रोजी मुंबईतील मीरा-भाईंदर परिसरात सुटकेसमध्ये एका महिलेचा शिरच्छेद केलेला मृतदेह सापडला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा रविवारी मुंबईतील कुर्ला परिसरात मेट्रोच्या बांधकाम साइटजवळ महिलेचा मृतदेह असलेली सुटकेस सापडल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.