मुंबई-गोवा महामार्गावर वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू

    17-Nov-2023
Total Views |



sambar road kill



मुंबई (विशेष प्रतिनिधी):
मुंबई-गोवा महामार्गावर गुरूवार दि. १६ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास एका सांबराचा मृतदेह आढळुन आला. अज्ञात वाहनाच्या धडकेत या सांबराचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले असुन त्याचे वय ७ ते ८ वर्ष असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मुंबई- गोवा महामार्गावरील आवाशी गावाजवळ आढळलेले सांबर नर जातीचा असुन त्याची वनअधिकाऱ्यांनी आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता सांबराच्या तोंडाला मार लागल्याचे तसेच पायाला खरचटलेल्या खुणा ही दिसल्या. यावरून वाहनाचा जोरदार धक्का बसल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.



sambar road kill

रत्नागिरी (चिपळुण)चे विभागीय वनअधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे वनपरिक्षेत्र अधिकारी पी.जी. पाटील पुढील तपास करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक अशोक ढाकणे, प्रियांका कदम, परमेश्वर डोईफोडे, रानबा बंबर्गेकर या तपासादरम्यान उपस्थित होते.


 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121