नाशिकमधून एकाच दिवशी दोन बिबट्यांचे यशस्वी रेस्क्यू

    17-Nov-2023
Total Views |
leopard rescue nashik



मुंबई (विशेष प्रतिनिधी):
नाशिक जिल्ह्यातील पवननगर आणि गोविंदनगर परिसरातुन शुक्रवार दि. १७ नोव्हेंबर रोजी एक नर आणि एक मादी अशा दोन बिबट्यांचे रेस्क्यू केले गेले आहे. मानवी वस्तीत असलेल्या या दोन्ही बिबट्यांचे शुक्रवारी सकाळी वनविभाग आणि रेस्क्यू टीम पुणे यांच्यामार्फत सुखरुप रेस्क्यू केले गेले असुन हे दोन्ही बिबटे २ किलोमिटरच्या परिसरात जवळजवळ आढळुन आले आहेत.

leopard rescue nashik



नाशिकमधील पवननगर आणि सावतानगरच्या हद्दीवरील सिडको परिसरात सकाळी ७:३० सुमारास बिबट्या फिरत असल्याचे स्थानिकांमार्फत कळले होते. वनविभाग आणि रेस्क्यू नाशिक डिव्हीजनची टीम अल्पावधीतच घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर या बिबट्याला शोधुन त्याला डार्ट मारुन बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर त्याला उचलून नाशिक वनविभागाकडे देण्यात आले आहे. दिड तासाच्या आत या नर बिबट्याचे रेस्क्यू पार पाडले गेले आहे. पवननगर परिसरातील नर बिबट्याचे रेस्क्यू सुरू असतानाच गोविंदनगर येथे बिबट्या असल्याचे ही फोनवरुन समजले. वनविभाग आणि रेस्क्यूची टीम बिबट्याचे रेस्क्यू पार पाडून पुन्हा गोविंदनगर येथे दाखल झाली. दिड तासाच्या आत कुणालाही इजा पोहोचू न देता हे रेस्क्यू पार पडले.

दरम्यान, दोन्ही बिबट आता वनविभाग आणि रेस्क्यू टीमचे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे असून त्यांच्यावरील पुढील कार्यवाहीचा निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी माहिती बचावकार्यास उपस्थीत असणाऱ्या रेस्क्यू टीमचे अभिजित महाले यांनी मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली.
"भर मानवी वस्तीत बिबट्या शिरल्यामुळे हे बचावकार्य काहीसे आव्हानात्मक झाले होते. वस्ती असल्यामुळे कुठलाही धोका पोहोचु न देता हे रेस्क्यू पार पाडणे गरजेचे होते. वनविभाग आणि आमच्याकडे उपलब्ध असलेल्या योग्य साधनसामुग्रीमुळे बचावकार्य सुखरूप पार पडले."

- अभिजीत महाले
रेस्क्यू सीटी, नाशिक डिव्हीजन




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.