महाराष्ट्र : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृतकाळात आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला आहे. हा कालखंड भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्त्व उभारणीचा कालखंड आहे, अशी संधी गमावू नका, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केले. रामटेक लोकसभा मतदारसंघ प्रवासात त्यांनी कळमेश्वर येथे सावनेर विधानसभा, काटोल येथे काटोल विधानसभा व डिगडोह येथे हिंगणा विधानसभा क्षेत्रातील भाजप सुपर वॉरिअर्सशी संवाद साधला.
बुथ स्तरावरून नवे नेतृत्त्व निर्माण व्हावे यासाठी कामाला लागा असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. पंतप्रधान मोदींबद्दल प्रचंड उत्सुकता आहे, ही कामे जनतेपर्यंत पोहचविणारा कार्यकर्ता भविष्यातील नेता म्हणून उदयास येईल. ते म्हणाले, भाजप हा जगातील सर्वांत मोठा पक्ष आहे, पंतप्रधान मोदी यांना १४ देशांनी त्यांच्या देशाचा सर्वोत्कृष्ठ पुरस्कार दिला तसेच जगातील ८० देशांनी त्यांचे नेतृत्त्व मान्य केले आहे. नरेंद्र मोदी सरकारने मागील ९ वर्षांत जेवढी कामे केली तेवढी त्यांच्या पूर्वीच्या कॉंग्रेस सरकारने केली नाही. ही कामे जनतेमध्ये घेऊन जाण्याचे काम भाजपा कार्यकर्त्यांनी करावे.
तीन तास तेरा महिने सतत काम करणारा बुथवरचा कार्यकर्ता हाच भाजपच्या विजयाचा शिल्पकार आहे. सावनेरमध्ये कार्यकर्ते काम करीत असले तरी केवळ काही मतांनी आपला उमेदवार पराभूत होतो. संपूर्ण पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठिशी असून आजपासून कामाला लागलो तर सावनेर विधानसभेत आपला विजय निश्वित आहे, असेही बावनकुळे म्हणाले. बावनुकुळे यांनी कळमेश्वर बाजार चौकात मेरी माटी मेरा देश अभियानात सहभाग झाले. कळमेश्वर, काटोल व हिंगणा येथे घर चलो अभियानाच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य जनता व व्यापाऱ्यांशी संवाद साधला. याठिकाणी शहरातील मान्यवरांच्या घरी स्नेह भेट देवून, मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली.
या वेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, विभागीय संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, रामटेक लोकसभा निवडणूक प्रमुख अरविंद गजभिये, आमदार समीर मेघे, डॉ. राजीव पोतदार, सुधीर पारवे, चरणसिंग ठाकूर, नरेश चरडे, संध्या गोतमारे, अनिल निधान, किशोर रेवतकर, रींकेश चवरे, आदर्श पटले, उकेश चौहान, वैशाली ठाकूर, प्रकाश टेकाडे, इमेश्र्वर यावलकर, नरेश मोटघरे, संदीप उपाध्याय, मंदार मंगले, प्रकाश टेकाडे, आशिष फुटाणे, गजानन आसोले, अशोक धोटे, किशोर चौधरी, किशोर मुसळे, अभय घुगल, रोहित मुसळे, रामराव मोवाडे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा सुपर वॉरिअर्स आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.