‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती’साठी अर्ज करण्याची मुदत २५ जुलैपर्यंत

    15-Jul-2022
Total Views | 752
Anna
 
 
 
 
 
 
मुंबई : मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यातील “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती” करिता दि. २५ जुलै २०२२ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
 
 
मातंग समाजातील मांग, मातंग, मिनी मादीग, मार्दीग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. करिता महामंडळाकडून सरासरी ६०% पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती” करिता अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्येष्ठता व गुणानुक्रमांकानुसार प्रथम ०३ ते ०५ विद्यार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे. विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधार कार्ड, शाळेचा दाखला, गुणपत्रिका, २ छायाचित्र, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इ. सह दोन प्रतींमध्ये आपला पूर्णपत्ता व भ्रमणध्वनी क्रमांकासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), मुंबई गृहनिर्माणभवन, कलानगर, तळमजला, रुम नं. ३३, बांद्रा (पू), मुंबई-४०००५१ या पत्त्यावर दि. २५ जुलै, २०२२ पर्यंत अर्ज करावा, असे जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, विकास महामंडळ (मर्या), जिल्हा कार्यालय मुंबई शहर उपनगर यांनी कळविले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
महाराष्ट्रात ४ वर्षांत ३८ हजार महिला आणि मुली बेपत्ता

महाराष्ट्रात ४ वर्षांत ३८ हजार महिला आणि मुली बेपत्ता

गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रातून ३८ हजार महिला आणि मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात नागपूर शहरातील ५ हजार २२७ महिला आणि अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत ४१ हजार १९३ मुला-मुलींचा शोध लावला असून, आता महिलांसाठी ‘ऑपरेशन शोध’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत १७ एप्रिल ते २५ मे या कालावधीत ४ हजार ९६० महिला आणि १३ हजार ६४ बालकांचा शोध लावण्यात यश आले. विशेष म्हणजे, नोंद नसलेल्या ७०३ बेपत्ता बालकांचाही शोध लागला, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121