मेट्रो उद्घाटनाला मोदींना निमंत्रण द्या; भातखळकरांची ठाकरेंकडे मागणी

    22-Feb-2022
Total Views | 129

Atul Bhatkhalkar
 
 
मुंबई : भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मंगळवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना नवीन मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटनासंगर्भात विनंती पत्र लिहिले आहे. अंधेरी आणि दहिसरच्या मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्याच काळात सुरू झालेल्या प्रकल्पांच्या उद्घाटनावेळी त्यांना न बोलवून कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडवल्याचा टोलाही भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
 
 
"मुंबई शहराच्या एकात्मिक मेट्रो वाहिन्यांच्या प्रकल्पांमध्ये केंद्र सरकारचे मोठे योगदान आहे. तसेच हा प्रकल्प चालू करण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचासुध्दा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांनाही कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सन्मानाने बोलवावे.", असे अतुल भातखळकर यांनी पत्रात म्हटले आहे. "देवेंद्र फडणवीसांच्या काळात सुरू झालेल्या प्रकल्पांच्या उद्घाटनावेळी त्यांना न बोलवून आपण आपल्या व राज्य सरकारच्या कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडवले. यावेळी तरी आपण आपल्या मनाचा मोठेपणा दाखवाल अशी आशा व्यक्त करतो.", असा टोलाही त्यांनी पुढे लगावला आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121