जे योग्य वाटतं, त्यासाठी भूमिका घ्याच!

लेखिका शेफाली वैद्य यांचे आवाहन

    04-Dec-2022
Total Views | 121
 
शेफाली वैद्य
 
 
 
 
मुंबई : ’‘समाजमाध्यमांमुळे पत्रकारिता क्षेत्रातील काही माध्यमांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. बातमी कुठली द्यायची आणि कशाप्रकारे द्यायची, हा ‘नॅरेटिव्ह’ ‘सेट’ करण्याचा या माध्यमांचा प्रयत्न समाजमाध्यमाने उघडा पाडला आहे. तुम्ही कुणाच्या बाबतीत बोलला नाहीत, तर मग तुमच्या बाबतीत कोण बोलणार? त्यामुळे आपल्याला जे वाटतं त्यासाठी भूमिका घेतलीच पाहिजे,” असे आवाहन लेखिका शेफाली वैद्य यांनी उपस्थितांना केले. ‘लोकमान्य सेवा संघा’च्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने विलेपार्ले येथील ‘लोकमान्य सेवा संघ’ येथे शनिवार, दि. 3 डिसेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात ’अंतरंग समाजमाध्यमांचे’ या विषयावर शेफाली वैद्य यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी ‘लोकमान्य सेवा संघा’च्या पदाधिकार्‍यांसह प्रेक्षकांचीही मोठी उपस्थिती होती.
 
 
यावेळी बोलताना शेफाली वैद्य पुढे म्हणाल्या की, ‘’मुळात केवळ मुख्य प्रवाहातील माध्यमे उपलब्ध असतानाचा संवाद एकेरी होता. परंतु, समाजमाध्यमांमुळे तुमचा वाचक किंवा प्रेक्षक हा थेट तुमच्याशी संवाद साधू लागला आहे. एखाद्या माध्यमाने किंवा वाहिनीने चुकीची बातमी दिली, तर त्याला खोडून काढण्यासाठी समाजमाध्यम हा एक मोठा पर्याय उपलब्ध झाला आहे.”
 
 
आजच्या एकांगी पत्रकारितेवर टीका करताना वैद्य म्हणाल्या की, ‘’काही माध्यमे आणि त्यातील कथित पत्रकार उगाच नको तिथे लक्ष ठेवून ‘हेडलाईन्स’ देण्याचा प्रयत्न करतात. बातमीदारीची तत्वे बाजूला सारून, अर्धसत्य सांगून आणि जाणीवपूर्वक चुकीचा ‘नॅरेटिव्ह’ ‘सेट’ करण्यासाठी हे प्रकार केले जातात. त्यामुळे आपल्याला जे वाटतं आणि जे सत्य आहे, ते उघडपणे मांडणे आणि त्यासाठी ठाम भूमिका घेणे अत्यंत गरजेचे आहे,” असे शेफाली वैद्य यांनी म्हटले आहे.
 
 
यावेळी शेफाली वैद्य यांनी आपल्या एका पुस्तकातील परिच्छेदाचेही वाचन केले. त्यात त्यांनी मुंबईतील गर्दीत पहिल्यांदा केलेला प्रवास, अनोळखी महिलेने त्यांच्याशी केलेले कथन अशा काही आठवणींचा समावेश होता. तसेच, अनेकांच्या आयुष्याशी निगडित असलेला ’सांगण्यासारखं प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही असतं, पण ते ऐकून घेणारं कुणी मिळालंच नाही तर?’ हा सवालही त्यांनी आपल्या पुस्तकाच्या परिच्छेदाच्या अनुषंगाने उपस्थित केला.
 
दीपक करंजीकरांचे खुमासदार भाषण आणि पुस्तक परिचय
 
शेफाली वैद्य यांनी लिहिलेल्या ’चितरंगी रे’ आणि ’नित्य नूतन हिंडावे’ या दोन पुस्तकांविषयी प्रसिद्ध अभिनेते, लेखक दीपक करंजीकर यांनी प्रकाश टाकला. आपल्या खुमासदार शैलीत आणि ओघवत्या शब्दांतून करंजीकरांनी वाचकांमध्ये शेफाली वैद्य यांच्या पुस्तकाविषयी असलेली उत्सुकता भरीस टाकण्याचे काम केले. अत्यंत सुंदर आणि स्पर्शून टाकणार्‍या शब्दांमधून दीपक करंजीकर यांनी शेफाली वैद्य यांच्या दोन्ही पुस्तकांचे सार सांगितले. तसेच, त्यासाठी शेफाली वैद्य यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून दिला. त्यांच्या भाषणामुळे कार्यक्रमाला आणखीनच रंगत आली होती.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पवई तलावाच्‍या पर्यावरणीय व जैव विविधिता संवर्धनासाठी मलजल वाहिन्‍या अन्‍यत्र वळविणे हाच कायमस्‍वरूपी तोडगा तलावातील जलपर्णी काढण्‍याकामी तात्‍काळ ५ संयंत्रे, अधिक मनुष्‍यबळाचा वापर करावा

पवई तलावाच्‍या पर्यावरणीय व जैव विविधिता संवर्धनासाठी मलजल वाहिन्‍या अन्‍यत्र वळविणे हाच कायमस्‍वरूपी तोडगा तलावातील जलपर्णी काढण्‍याकामी तात्‍काळ ५ संयंत्रे, अधिक मनुष्‍यबळाचा वापर करावा

पवई तलावाच्‍या पर्यावरणीय व जैव विविधता संवर्धनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्‍यात येत आहेत. या अंतर्गत जलपर्णी, तरंगत्‍या वनस्‍पती काढण्‍याची कार्यवाही वेगाने करण्‍यात येत आहे. मात्र, तलावात मलजल मिसळत असल्‍याने जलपर्णी अधिक वेगाने फोफावत आहे. त्‍यासाठी पवई तलावात सांडपाणी येण्यापासून अटकाव करुन त्या वाहिन्या अन्यत्र वळविणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे या दोन कामांच्‍या स्‍वतंत्र निविदा प्रक्रिया अंतिम टप्‍प्‍यात आहे. पवई तलावाच्‍या नैसर्गिक समृद्धी वाढीसाठी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121